परंडा (प्रतिनिधी) - रँगिंग हे अक्षम्य कृत्य असून यामुळे अनेक विद्यार्थ्यांचे करिअर उद्ध्वस्त झाले असल्याचे  पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना आपल्या मनोगतामध्ये सांगितले.

श्री भवानी शिक्षण प्रसारक मंडळ धाराशिव संचलित शिक्षण महर्षी गुरुवर्य रा गे शिंदे महाविद्यालय परंडा महाराष्ट्र शासन आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर, मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयात अँटी रॅगिंग मार्गदर्शन कार्यक्रम नुकताच संपन्न झाला.या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून परंडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार हे उपस्थित होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ सुनिल जाधव हे उपस्थित होते तर व्यासपीठावर उपप्राचार्य डॉ महेशकुमार माने व अँटी रँगिंग समितीचे चेअरमन तथा सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ शहाजी चंदनशिवे यांची उपस्थिती होती. 

यावेळी महाविद्यालयातील विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक प्रा डॉ शहाजी चंदनशिवे यांनी केले. यावेळीमहाविद्यालयातील कनिष्ठ वरिष्ठ विभागातील प्राध्यापक विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी प्रमुख पाहुणे पोलीस निरीक्षक  इज्जपवार यांनी अँटी रॅगिंग कायद्यासंदर्भात सविस्तर मार्गदर्शन केले . विद्यार्थ्यांनी जाणून-बुजून वाईट मार्गाला जाऊ नये असे त्यांनी विविध उदाहरणाच्या दाखल पटवून सांगितले.आई-वडिलांनी आपल्या मुला मुलींना महाविद्यालयामध्ये काबाड कष्ट करून शिक्षण घेण्यासाठी पाठवतात त्या कष्टाची जाणीव ठेवून विद्यार्थ्यांनी आपल्या करिअरच्या संधी उपलब्ध कराव्यात.यावेळी त्यांनी प्रकर्षाने विद्यार्थ्यांनी यशाचा मार्ग कसा स्वीकारावा या संदर्भात स्वतःचे उदाहरण देत मी कसा घडलो यावर त्यांनी विद्यार्थ्यांना मंत्रमुग्ध केले.काही अनुचित प्रकार घडल्यास त्यांनी आपल्या प्राध्यापकांना किंवा माझ्याशी संपर्क करावा पोलीस प्रशासन आपल्या संरक्षणासाठी कटिबद्ध असेल असे त्यांनी ग्वाही दिली.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पोलीस कॉन्स्टेबल भांगे श्रीकांत, प्रा तानाजी फरतडे, प्रा विजय जाधव, प्रा सौ कीर्ती नलवडे, प्रा सौ प्रतिभा माने, प्रा सौ मोरवे यांच्यासह शिक्षकेतर कर्मचारी हनुमंत मोर्तंडे, प्रमोद केसकर ,वसंत राऊत  यांनी सहकार्य केले. शेवटी आभार प्रा विजय माने यांनी मानले तर या  कार्यक्रमाची सांगता  राष्ट्रगिताने करण्यात आली.

 
Top