उमरगा (प्रतिनिधी)- शहरातील भारत शिक्षण संस्था संचलित सेंटर ऑफ एक्सेलन्स श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयात गुरुवारी, (दि 29)छत्रपती संभाजीनगर विभागाच्या करिअर कट्टा विद्यार्थी संवाद कार्यशाळेचा समारोप करण्यात आला.

महाराष्ट्र राज्य उच्च आणि तंत्र शिक्षण विभाग, महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने करिअर कट्टा अंतर्गत छत्रपती शिवाजी महाविद्यालयात एक दिवसीय विद्यार्थी संवाद कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी प्रभारी प्राचार्य डॉ संजय अस्वले होते. यावेळी महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्राचे अध्यक्ष डॉ यशवंत शितोळे, नियामक मंडळाचे सदस्य प्राचार्य डॉ गुलाब राठोड, डॉ जी एच जाधव, उपप्राचार्य डॉ विलास इंगळे, डॉ पी ए पिठले आदींची उपस्थिती होती. यावेळी बोलताना डॉ यशवंत शितोळे म्हणाले की, विद्यार्थ्यानी महाविद्यालयीन जीवनात करिअरचे स्वप्न पाहताना वेळेचे व उपलब्ध साधने, मोबाईल वापरते वेळी काय घ्यावे आणि कसे घ्यावे याचे नियोजन करणे आवश्यक असल्याचे सांगितले. कार्यशाळेला तालुका समन्वयक डॉ प्रशांत मोटे, डॉ किरण लोमटे, तुळजापूर तालुका समन्वयक डॉ एम बी बिरादार, डॉ एस पी पसरकले, डॉ ए के कटके, डॉ राम सोलंकर, डॉ एस डी कांबळे, डॉ ए सी पाटील, डॉ नागेश कांबळे, अमित रेड्डी, आदिसह श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयातील विद्यार्थी संसदेचे 30 तसेच ईतर महाविद्यालयातील 240 विद्यार्थी असे 315 विद्यार्थी, 40 प्राध्यापक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थी संसदेच्या सदस्यांनी केले. डॉ एस पी पसरकले यानी आभार मानले.

 करिअर कट्टाचे सर्व उपक्रम नियमित तीन ते साडेतीन तास आपल्या मोबाईल वर घेताना  आएएस आपल्या भेटीला आणि स्पर्धा परीक्षा तयारी, उद्योजक आपल्या भेटीला, प्रत्येक महिन्याचे तीन सर्टिफिकेट कोर्स व इतर कौशल्य विकास, मूल्य, संस्कार रुजवणारे उपक्रम करिअर घडविण्यास उपयुक्त आहेत. विद्यार्थ्यानी त्याचा स्मार्ट वापर केला तर स्मार्ट करिअर घडेल असेही डॉ यशवंत शितोळे यांनी सांगितले.

 
Top