धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव शहरातील आर्य चाणक्य माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थी विद्यार्थिनींनी भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त देशभर सुरू असलेल्या हर घर तिरंगा मोहिमेअंतर्गत आज तिरंगा रॅली काढली.
या तिरंगा रॅलीत विद्यार्थी विद्यार्थिनींनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी कार्य केलेल्या महापुरुषांचा जयजयकार करत देशभक्तीचे दर्शन घडवले. शाळेचे मुख्याध्यापक डॉ. मनीष देशपांडे यांच्या हस्ते या रॅलीला हिरवा झेंडा दाखवून रॅलीची सुरुवात करण्यात आलीतर या निमित्ताने प्रशालेत करण्यात आलेल्या ध्वजारोहण प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका देशमाने यांच्या हस्ते संपन्न झाले. ही रॅली आर्य चाणक्य विद्यालयापासून समर्थनगर मार्गे काढण्यात आली होती.