कळंब (प्रतिनिधी)-येथील नगर परिषद कळंब अंतर्गत हर घर तिरंगा रॅलीचे तर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या प्रचार प्रसिद्धीसाठी गृहभेट कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. जनतेच्या मनात स्वातंत्र्य लढ्याच्या स्मृती जागुत राहाव्यात स्वातंत्र्य संग्रामातील अज्ञात नायक क्रांतिकारक स्वातंत्र्य संग्रामात घडलेल्या विविध घटनांचे स्मरण व्हावे. तसेच स्वातंत्र्यासाठी चेतवलेले स्फुल्लिंग कायम तेवत राहावीत व देशभक्तीची जाज्वल्य भावना कायमस्वरूपी जनमानसात राहावि  या उद्देशाने दैदीप्यमान इतिहासाचे अभिमानपूर्वक स्मरण करण्यासाठी दि. 9 ते 15 ऑगस्ट या कालावधीत घरोघरी तिरंगा हा उपक्रम राबविण्यात येत आहे. बरोबरच मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ची पण अंमलबजावणी मोठ्या प्रमाणात करण्यात येत आहे.  नगर परिषद कळंब मार्फत हर घर तिरंगा व मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या प्रचार प्रसिद्धीसाठी नगर परिषद शाळा क्रमांक 1 व 2 विद्यार्थी तसेच शिक्षक गण व नगर परिषदेच्या सर्व विभातील कर्मचारी, सामाजिक कार्यकर्ते  तसेच कळंब शहारतील माजी सैनिक व  नागरिक यांच्या  रॅलीचे  आयोजन करण्यात आले. सदरील  रॅलीची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजाच्या अश्वरूढ पुतळयाचे पूजन करून सुरुवात करण्यात आली . सदरील  रॅलीचे उद्घाटन  हे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे कळंब धाराशिव विधानसभा क्षेत्र अध्यक्ष नितीन लक्ष्मनराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी कळंब नगर परिषदेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी  गोपाल तापडिया यानी रॅलीचे आयोजन तथा प्रयोजन बाबत सर्वानी माहिती देण्यात आली. यावेळी संजयजी मुंदडा ,प्रकाश भडंगे ,मकरंद पाटील , अशोक चोंदे, शिवाजी गिड्डे , किशोर तिवारी, सौ वनिता कटाळे ,श्रीमती भारती गायकवाड, सैनिक ,पत्रकार ,महिला, ह्या उपस्थित होत्या .सदरील रॅली पुनर्वसन सावरगांव मधून बाबा नगर कल्पना नगर मार्गे घरोघरी नागरिकांना भेटत व त्यांना योजनेचे फॉर्म वाटत  नगर परिषदेचे नेहरू बाल उद्यान केंद्रातील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यांचे मान्यवराचे हस्ते पूजन करण्यात आले. तसेच सदरील रॅली अहिल्यादेवी होळकर चौकातून स्वतंत्र्यवीर सावरकर यांच्या पुतळ्याचे मान्यवराच्या हस्ते पूजन करण्यात आले राष्ट्रगीताच्या गायना नंतर रॅलीचा समारोप करण्यात आला, 

सदरील रॅलीच्या यशस्वितेसाठी नगर परिषद शाळेचे सर्व विद्यार्थी शिक्षक तसेच शिक्षिका व नगर परिषद सर्व विभाग प्रमुख व कर्मचारी यांनी सहभाग दिला तर नगर परिषदेच्या वतीने विक्रम  समुद्रे विक्रम  यांनी सर्वाचे आभार व्यक्त केले.

 
Top