धाराशिव (प्रतिनिधी)- गेल्या 5 दिवसापासून डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात कर्मचारी विद्यापीठ निधीतून एकत्रित वेतनावर नियुक्ती करण्यात यावी. यासाठी रोजंदारी कामगारांचे बेमुदत काम बंद आंदोलन सुरू आहे.
आज दि.13 आगस्ट पासुन भीमशक्ती रोजंदारी संघटनाच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उपपरिसर धाराशिव येथे बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केले आहे. त्यांची प्रमुख मागणी आहे की विद्यापीठातील ठेकेदारी पद्धत बंद करून ज्या पद्धतीने काही कर्मचारी विद्यापीठ निधीतून एकत्रित वेतनावर नियुक्ती केली आहे. त्या धर्तीवर इतरही रोजंदारी कामगारांना एकत्रित वेतनावर नियुक्ती करण्याबाबतचा ठराव घेऊन रोजंदारी कामगारांना योग्य न्याय देण्यात याव्या. सध्याच्या काळामध्ये दहा ते बारा हजार पगारावर काम करावे लागत आहे. अनेक रोजंदारी कामगारांचे संसार उध्वस्त झाले आहेत. काहींचे उध्वस्त होण्याच्या मार्गावर आहेत. ज्या कामगाराने विद्यापीठांमध्ये दहा ते पंधरा वर्षे सातत्यपूर्ण सेवा दिली आहे अशा कामगारांना विद्यापीठाने न्याय द्यावा. या मागणीसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उपपरिसर येथे भीमशक्ती रोजंदारी संघटनेच्यावतीने बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केले आहे. या काम बंद आंदोलनात संघटनेचे एस. एल. शिंदे, ए. एफ. लोंढे, एस. टी. वाघमारे, एन. ए. रणदिवे, एन. एस. शिंदे, डी. के. वाघमोरे. आय. एन. भालेराव, एन. एन. सूर्यवंशी, के. डी. हावळे, एस. पी. कोकाटे, एम. एस. भोसले, एस. व्ही. कांबळे या कर्मचाऱ्यांनी बेमुदत काम बंद आंदोलनात सहभाग नोंदविला आहे.