ढोकी (प्रतिनिधी)- बदलापुर येथील शाळेमध्ये चिमुकुलीवर झालेल्या आत्याचार घटनेच्या निषेधार्थ ढोकी ता धाराशिव येथे निषेध रॅली काढण्यात आली हि निषेध रॅली ढोकी येथील छञपती शिवाजी महाराज चौक येथून आशाताई, सर्व शाळा व ग्रामस्थ यांनी सकाळी 10 वाजता निषेध रॅली काढली.

माणुसकीला काळीमा फसणां-या बदलापुर च्या घटनेचा सर्व स्तरावर निषेध व्यक्त केला जात आहे ढोकी येथील आशाताई, शालेय मुली मुले यांनी हातात काळे झेंडे घेऊन तसेच पुरुष व तरुणांनी काळ्या फिती लावून महिला संरक्षण कायदा करा बदलापुर येथील नराधमाला फाशी द्या,आत्याचार करणा-या नराधमाला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे, हम भारत की नारी है,फुल नही चिंगारी है अशा जोरदार घोषणा  देऊन घटनेचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करुन दोषी सर्व आरोपीना कठोरात कठोर शासन करावे, अशी मागणी करण्यात आली. हि निषेध रॅली लातुर -बार्शी राज्यमार्गवरुन छञपती संभाजी महाराज चौक, धनगरगल्ली, वस्तादवाडा, नगरेश्वर नगर, काझी गल्ली, गणेश मंदीर, मारवाडगल्ली, हनुमान  मंदीर चौकातुन ढोकी येथील सोसायटीसमोर आली असता त्याठिकाणी निषेध रॅलीस आशा सुपरवायझर रेखाताई कदम यांनी फेसबुक वरील अश्लील व्हिडीओ बघुन माणसातील हैवान जागा होत आहे. तसेच सिनेमातील नटनटीचे अर्धनग्न कपडे, विचित्र हावभाव, तसेच जाहिरातीचे पोस्टर्स लावलेली बघून पुरुषामध्ये अत्याचाराचे प्रमाण वाढत असल्याने यावर शासनाने कठोर बंदी घालावी. बदलापुर येथील आरोपीस तात्काळ फास्ट ट्रक कोर्टात केस चालवून सर्व दोषी आरोपीना फाशीची शिक्षा देण्यात यावी. तसेच आशा घटना रोखण्यासाठी कायद्यात कडक कलमे अंमलात आणून दोषींना तात्काळ सजा देण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली.  ढोकीचे उपसरपंच अमोल समुद्रे, पंचायत समितीचे माजी सदस्य संग्राम देशमुख, बहुजन आघाडीचे राहुल पोरे, पहिलवान संघटनेचे तालुकाध्यक्ष सतीश वाकुरे, नागरिक आरेफ काझी आदिंनी बदलापूर घटनेचा आपआपल्या मनोगतात तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला. या निषेध रॅलीत ढोकी प्राथामिक आरोग्य केंद्रातील आशा सुपरवायजर, आशाताई, महिला तेरणा साखर कारखाना प्रशाला व जुनिअर कॉलेज, सौ स्नेहलता देशमुख विद्यालय, जिल्हा परिषद प्रशाला, जिल्हा परिषद ऊर्दु शाळा, जिल्हा परिषद कन्या शाळेतील मुले, मुली, शिक्षक, शिक्षिका यांच्यासह ढोकी गावातील ग्रामस्थ, तरुण  मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी ढोकी पोलिस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक मोरे यांनी महिलेचे निवेदन स्वीकारले.

 
Top