धाराशिव (प्रतिनिधी)- येथील श्रीपतराव भोसले हायस्कूलने आंतरराष्ट्रीय गणित ऑलिम्पियाड स्पर्धेत घवघवीत यश संपादन करत 13 विद्यार्थी सुवर्ण पदक विजेते ठरले.
सन 2023 - 24 मध्ये झालेल्या या परीक्षेत इ 5 वी मधून कु.शांभवी संदीप जगताप तर सहावीमधून अर्पिता नेताजी मुळे, हेरंब पवार, मनस्वी महेश इंगळे तर सातवीमधून आदिती विजयकुमार काळे व आठवीमधून स्वराज निकम, पृथ्वीराज हुग्गे तर नववीमधून सारंग पोपट बेलदार, श्रेयश लालासाहेब पवार, रणवीर विठ्ठल लोमटे व 10 वीतून सागर गांधले, स्वप्नील जाधव, आशिष मोजगे या सर्व विद्यार्थ्यांना सुवर्ण पदक प्राप्त झाले. या विद्यार्थ्यांना प्रशालेच्या वतीने पुष्प गुच्छ व सम्मानचिन्ह, प्रमाणपत्र, सुवर्णपदक देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कारीत करण्यात आले.
या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष सुधीर पाटील, सरचिटणीस प्रेमाताई पाटील, प्रशासकीय अधिकारी साहेबराव देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी आदित्य पाटील यांनी सर्व विदयार्थ्यांचे व अध्यापकांचे अभिनंदन केले. यावेळी प्रशालेचे प्राचार्य नंदकुमार नन्नवरे, उपमुख्याध्यापक प्रमोद कदम, पर्यवेक्षक यशवंत इंगळे,श्रीमती बी. बी. गुंड, निखीलकुमार गोरे, धनंजय देशमुख, गणित विभाग प्रमुख धनंजय वीर, संतोष देशमुख, केशव पाटील, हनुमंत कोतले, किशोर संकपाळ, भारत नाडे, मनोज भुसे, दत्तात्रय इनामदार प्रताप जाधव, लक्ष्मण सांळुखे, सुर्यकांत पाटील, अनिल चंदनशिवे नरेंद्र पाटील, रामेश्वर बोबडे, के. जी .लोंढे, अजित माने, गणित शिक्षिका एस.एस. ईश्वरगोंडा, देवकन्या कांबळे व कविता भोसले व मोठ्या संख्येने विद्यार्थी यावेळी उपस्थित होते.