धाराशिव (प्रतिनिधी)-जिल्ह्याचे नुतन पोलीस अधीक्षक संजय जाधव यांनी  दि.25 ऑगस्ट 2024 रोजी पोलीस ठाणे कळंब येथे भेटी दरम्यान पोलीस अधिकारी व अंमलदार यांचेशी संवाद साधला. तसेच कळंब पोलीस ठाणे येथील पथकाने पोर्टल दवारे विशेष अभियान राबवून पोलीस ठाणे कळंब हद्दीमधील नागरिकांचे हारवलेले व चोरीस गेलेले एकुण 28 मोबाईल पोर्टल दवारे शोधून परत मिळवून  पोलीस अधीक्षक संजय जाधव यांचे हस्ते ते तक्रारदार यांना परत केले. 

सदरची कामगिरी ही पोलीस अधीक्षक संजय जाधव, अपर पोलीस अधीक्षक गौहर हसन, उपविभागीय पोलीस अधिकारी कळंब यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस ठाणे कळंबचे पोलीस निरीक्षक रवी सानप, सपोनि हनुमंत कांबळे, पोलीस अंमलदार तारळकर, कदम, मोटेगावकर, खाडे यांचे पथकाने केली आहे.

तसेच पोलीस निरीक्षकरवी सानप यांनी कळंब पोलीस ठाणे परिसरामध्ये अटल आनंद घनवन योजने अंतर्गत एकुण 6 हजार वृक्षांची लागवड केली आहे. ज्यामध्ये बऱ्याच दुर्मीळ रोपट्यांची लागवड केली आहे. वृक्ष लागवड केलेल्या रोपट्यांना पाणी देण्यासाठी पाईपलाईनची सुविधा केली आहे. यासाठी  विश्वास करे विभागीय वन अधिकारी, सामाजिक वनिकरण विभाग धाराशिव, शिरीष कुलकर्णी वनपाल कळंब  यांचे विशेष सहकार्य लाभले. सदरच्या अटल आनंद घनवन प्रकल्पाचे उदघाटन पोलीस अधीक्षक संजय जाधव यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी पोलीस ठाणे कळंबचे पोलीस निरीक्षक रवी सानप, सपोनि हनुमंत कांबळे, मसपोनि श्रीमती पुंडगे, सपोनि मगर, पोउपनि चाटे, पोउपनि पिलगंवाड तसेच सर्व पोलीस अमंलदार उपस्थित होते.

 
Top