धाराशिव (प्रतिनिधी)- पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचे आजोळ ग्राम म्हणजे धाराशिव जिल्ह्यातील चोराखळी तालुका कळंब हे कळंब हे ग्राम असून मौजे चोराखळी येथे पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी यांनी बांधलेले अप्रतिम असे श्रीक्षेत्र पापनाश मंदिर आहे. या पापनाश मंदिरातील महादेवाची स्थापना प्रत्यक्ष प्रभू रामचंद्रांनी केलेली असल्याची व्याख्याही का अक्षय्य का आहे. आजही पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या मातोश्री सुशीला देवी या मौजे चोराखळी येथे त्यांचे वंशज असून सातव्या पिढीतील श्री दत्तात्रय मंडळ पाटील असून मौखिक रूपाने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर या अजूनही आल्यावर कशा खेळायच्या बागडडायच्या याच्या कथा सांगितल्या जातात. त्याचप्रमाणे पुण्यश्लोक आहिल्यादेवी विवाह नंतर सुद्धा अजून येत असत आणि नागझरी अशा दोन पिण्याच्या पाण्याच्या विहिरी बांधलेले असून श्रीक्षेत्र पापनाश मंदिराची ही स्थापना ची उभारणी त्यांनी केलेली आहे.
या मंदिराची उभारणी इसवीसन चैत्र शुद्ध 5शके 1706 इसवी सन.1784 शुक्रवार रोजी केलेली आहे. पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या स्त्री जन्मशताब्दी सोहळ्यानिमित्त संस्कार भारती देवगिरी प्रांता तर्फे राज्यात व्याख्यान माला, कीर्तन, आख्यान, चित्रकला, वक्तृत्व सर्धेंचे आयोजन केलेले असून दिनांक 21 ऑगस्ट रोजी संस्कार भारती, धाराशिव आणि श्री क्षेत्र पापनाश देवस्थान ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने संस्कार भारती देवगिरी प्रांताच्या अध्यक्षा प्राध्यापक स्नेहलताई पाठक यांच्या ओघवत्या व प्रभावी वक्तृत्वाच्या शैलीने ग्रामस्थ भारावून गेले. राजमाता अहिल्यादेवी यांच्या जीवनातील संघर्षाचे पर्व पुनश्च अनुभवले. याप्रसंगी पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या मातोश्री च्या सातव्या पिढीतील दत्तात्रय मैंदाड पाटील यांचा यथोचित सन्मान करण्यात आला. याप्रसंगी संस्कार भारती देवगिरी प्रांताचे लोककलाविधाप्रमुख डॉ. सतीश महामुनी, बोंदर, तुळजापूर जिल्हा सचिव प्रभाकर चोराखळीकर, संगीत विधेचे सुधीर पवार आणि श्री पापनाश देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष दिगंबरराव मैंदाड यांनी याप्रसंगी श्रीक्षेत्र पापनाश मंदिराच्या सुधारणेबद्दल व वैभव शाली पर्वाची सुरुवात करून मौजे चोराखळी येथे अनेक उपक्रम हाती घेऊन पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या प्रेरक जीवनाची,धर्म रक्षणाची,स्त्री मुक्ती,स्त्री शिक्षण ,आदर्श राज्यकारभाराची, राज्य संरक्षणाची आणि सर्वत्र आदर्शवत जीवन गाथेचे पुनश्च देशवासीयांना दर्शन घडवून आदर्श ग्राम, तालुका, जिल्हा, राज्य आणि देश यासाठी विश्वस्त मंडळ कार्य करणार असल्याचे प्रतिपादन केले याप्रसंगी अशोक दाजी मैंदाड मधुकर कुलकर्णी, नवनाथ मैंदाड भगवान, मैंदाड बाबूलाल शेख आपणास देव स्थान देवस्थानचे विश्वस्त मंडळ उपस्थित होते.