भूम (प्रतिनिधी)- बदलापूर येथील शाळेमध्ये एका चिमूरड्या लहान मुलीवर बलात्कार केल्यामुळे संतप्त झालेल्या भूम तालुक्यातील शिवसैनिकांनी व महिलांनी भूम गोलाई चौकामध्ये शिवसेना भूम तालुका प्रमुख ॲड. श्रीनिवास जाधवर यांच्या नेतृत्वाखाली महिला आघाडी जिल्हा संघटक जिनत सय्यद यांच्या उपस्थितीत मुली व महिला आघाडी तसेच रवींद्र शाळेतील मुलीनी भूम गोलाई चौकामध्ये निषेध करून नाराधमांना फाशीची शिक्षा देण्यात यावी. अशी मागणी करुन सदर निषेध नोंदवला.
यावेळी विधानसभा समन्वयक दिलीप शाळू, महिला आघाडी जिल्हा संघटक जिनत सय्यद, शिवसेना तालुकाप्रमुख ॲड. श्रीनिवास जाधवर, विधानसभा युवासेना प्रमुख प्रल्हाद आडागळे, महिला आघाडी तालुका संघटक उमादेवी रणदिवे, उपतालुका प्रमुख रामभाऊ नाईकवाडी शहरप्रमुख ॲड प्रकाश आकरे,माजी शहर प्रमुख दीपक मुळे, ॲड. विनायक नाईकवाडी, शिवसेनेचे भगवान बांगर, विहंग कदम, आनिल मुळूक ,मीनाताई कोकणे ,रवींद्र हायस्कूल भूम या शाळेतील विद्यार्थिनींनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला यांच्यासह गावातील नागरिक उपस्थित होते. भूम गोलाई चौकामध्ये निषेध करून आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी केली आहे. याप्रसंगी पदाधिकाऱ्यांसह गावातील नागरिक उपस्थित होते.