कळंब (प्रतिनिधी)-शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालयात मुलींचे आरोग्य आणि स्वच्छता या विषयावर एक दिवसीय प्रशिक्षण शिबीर घेण्यात आले.

शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालय ,कळंब येथे अंतर्गत गुणवत्ता कक्ष,महिला सक्षमीकरण कक्ष आणि सृष्टी  सामाजिक विकास संस्था गडचिरोली,  आयडीआयएडीए पुणे, लोकहीत सामाजिक संस्था कळंब यांच्या संयुक्त विद्यमाने महिला कर्मचाऱ्यांसाठी आणि किशोरवयीन मुलींसाठी “ मुलींचे आरोग्य आणि स्वच्छता“ या विषयावर एक दिवसीय प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. या कार्यशाळेत सुमारे 200 मुलींनी सहभाग घेतला. 

डॉ  मीरा दशरथ आणि डॉ. प्रगती भंडारी यांनी कार्यशाळेत मार्गदर्शन केले.  सृष्टी संस्थेचे संस्थापक केशव गुरनुळे यांनी आरोग्य आणि स्वच्छता या विषयावर उपस्थितांना संबोधित केले. कुटुंब आणि समाजाच्या प्रगतीसाठी मानसिक आरोग्य उत्तम असणे अत्यंत आवश्यक आहे. महिलांचे मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी आवश्यक पावले ठरू शकतात असे प्रतिपादन केले. कार्यक्रम समन्वयक प्रा.अर्चना मुखेडकर यांनी  प्रास्तविकात आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.मीनाक्षी जाधव यांनी केले. तर आयोजन महिला सक्षमीकरण कक्ष सदस्य डॉ. पल्लवी उंदरे यांनी  केले. तर आभार प्रदर्शन लोकहीत सामाजिक विकास संस्था, कळंब अमर ताटे यांनी  केले. यावेळी विवेक गिरी, दीपाली काळे, अभिनित झा, सागर बोलभट (पुणे),  कुणाल गुरनुळे, केशव गुरनुळे, तुषार वाघमारे, सुधाकर श्रीसागर, राजू साठे उपस्थित होते. तसेच महाविद्यालयातील  प्रा.गपाट, प्रा.अडसूळ, प्रा,खंडागळे, प्रा.टिपरसे, प्रा खोसे  यांच्यासह प्राध्यापक, मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.


 
Top