तुळजापूर (प्रतिनिधी)-महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांनी सोमवार दि. 5 ऑगस्ट रोजी  दुपारी 3 सुमारास श्रीक्षेत्र तुळजापूर येथे येवुन श्रीतुळजाभवानी मातेची मनोभावे पुजा करुन यथासांग  दर्शन घेतले.

यावेळी  त्यांची पुजा त्यांचे पारंपारिक पुजारी कुमार दिंगबर इंगळे व त्यांचे पुञ सागर इंगळे यांनी केले. यावेळी राज ठाकरे सुमारे  हात जोडुन श्रीतुळजाभवानी मातेस प्रार्थना केली. यावेळी बाळा नांदगावकर, शाम जाधव, दिलीप धोत्रे, मंदीराचे विश्वास परमेश्वर, जिल्हा उपाध्यक्ष महेश जाधव, निलेश परमेश्वर मयुर गाडवेसह जिल्ह्यातील मनसे पदाधिकारी उपस्थितीत होते.


 
Top