भूम (प्रतिनिधी)- राजर्षी शाहू महाराज जेष्ठ साहित्यीक व कलावंत मानधन सन्मान योजना जिल्हास्तरीय समितीवर सदस्य म्हणून ज्येष्ठ पत्रकार शंकर खामकर यांची निवड झाली. या निवडीबदल त्यांचा भारतीय जनता पार्टी भूम तालुक्याच्यावतीने पक्ष कार्यालयात सत्कार करण्यात आला.
सोमवार दिनांक 5 ऑगस्ट 2024 रोजी भूम तालुक्यातील ज्येष्ठ पत्रकार शंकर विठ्ठल खामकर यांची राजर्षी शाहू महाराज जेष्ठ साहित्यिक व कलावंत मानधन सन्मान योजनेच्या जिल्हा स्तरीय समितीवर सदस्य म्हणून नियुक्ती झाल्याचे लेखी आदेश पत्र सदस्य सचिव तथा जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी धाराशिव यांच्या सहीचे प्राप्त झाले.
नियुक्तीपत्र मिळताच समर्थक मित्र परिवारासह भारतीय जनता पार्टी परांडा विधानसभा निवडणुक प्रमुख बाळासाहेब क्षीरसागर, तालुकाध्यक्ष महादेव वडेकर, जिल्हा उपाध्यक्ष सुदाम पाटील, सरचिटणीस संतोष सुपेकर, तालुका उपाध्यक्ष हेमंत देशमुख, अ.जा. मोर्चा ता.अध्यक्ष प्रदीप साठे, शहर अध्यक्ष बाबासाहेब वीर, महिला जिल्हा उपाध्यक्ष लताताई गोरे, तालुका चिटणीस संतोष औताडे, युवा तालुकाध्यक्ष गणेश भोगील, रघुनाथ वाघमोडे, माजी सैनिक संघटनेचे तालुका अध्यक्ष हेमंत देशमुख, शिवाजीराव चव्हाण, तुकाराम मुंडे, लक्ष्मण भोरे, ज्ञानेश्वर सानप, उद्योग आघाडीचे तालुका अध्यक्ष चंद्रकांत गवळी, बापू बगाडे, सुरेश ऊपरे, उपसरपंच बापू नागरगोजे, शिवाजी नागरगोजे रामेश्वर, विधी सल्लागार विभागाचे तालुका अध्यक्ष संजय शाळू, संजय गांधी निराधार योजना समिती वाशी तालुका सदस्य सुधीर घोलप यांच्या शिवाय शिवसेनेचे ज्येष्ठ नेते दत्ता काळे, शिवसेना उबाठा ठाकरे गटाचे जेष्ठ नेते महादेव वारे यांनी देखील सत्कार करून शुभेच्छा दिल्या.