तुळजापूर (प्रतिनिधी)- तालुक्यातील सावरगाव येथे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त मधुकरराव चव्हाण यांच्या हस्ते अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन दिनांक 7 ऑगस्ट रोजी करून जयंती साजरी करण्यात आली. अण्णाभाऊंचे साहित्य लेखन आज विद्यापीठातील अभ्यासाचा विषय ठरले आहे. तसेच त्यांनी घालून दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वानुसार जीवनामध्ये आचरण करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन मधुकरराव चव्हाण यांनी यावेळी व्यक्त केले.
यावेळी त्यांच्या समवेत पंचायत समितीचे माजी उपसभापती विलास डोलारे, सावरगावचे माजी सरपंच रामेश्वर, आबा तोडकरी, माजी सदस्य राजकुमार पाटील, वडगावचे सरपंच गौरीशंकर कोडगिरे, मोडीचे माजी सरपंच धनंजय काशीद, उत्तम माने, संजय लिंगफोडे, यशवंत कुलकर्णी, प्रताप माने, चंद्राबद्दल माळी, गणेश फंड, धर्मा शिंदे, अण्णासाहेब लिंगफोडे, रामेश्वर माळी, पंढरी डोके, एकनाथ अक्कलकोटे, नागनाथ शिंदे, राणा तावडे, अथर्व तोडकरी, मनमत तोडकरी, रमेश काडगावकर, रमेश चौगुले, नंदकुमार पाटील यांचे समाज बांधव उपस्थित होते. यावेळी मधुकरराव चव्हाण यांनी सावरगाव पंचक्रोशीतील प्रसिद्ध नागनाथ महाराज मंदिर यांचेही दर्शन घेतले.