भूम (प्रतिनिधी)-भूम-परंडा- वाशी विधानसभा मतदारसंघातील आरोग्य दूत डॉ. राहुल घुले यांनी त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांसह धाराशिवचे पालकमंत्री डॉ. तानाजी सावंत यांच्या हस्ते पुणे येथे शिवसेना शिंदे गटात शिवबंधन बांधून प्रवेश केला.

डॉ. राहुल भीमराव घुले यांनी गेल्या एक वर्षापासून भूम, परंडा, वाशी मतदारसंघात आरोग्य विभागात मोफत शस्त्रक्रिया करून व मतदार संघातील वयोवृद्ध नागरिकांना काठ्या देऊन या भागात एक वेगळे स्थान निर्माण केले होते. त्यांनी आत्तापर्यंत मोफत आरोग्य तपासणी शिबिर मोफत ऑपरेशन, खतना शिबीर यासारखे विविध आरोग्य विषयक उपक्रम राबवले. शेतीचे त्याचबरोबर शेतकऱ्यांसाठी मोफत डीपी वाहतूक, लग्न समारंभासाठी मोफत भांडे व साहित्य देण्याचे उपक्रम त्यांनी राबवले. सामाजिक कार्याच्या जोरावर त्यांनी भूम-परंडा-वाशी विधानसभा मतदारसंघात मोठी ताकद निर्माण केली होती. त्यामुळे त्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केल्याने आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांना मोठी ताकद मिळणार आहे. डॉ. राहुल घुले यांच्यासोबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे भाऊसाहेब मुंडे यांच्या सह परंडा मतदार संघातील विविध गावातील आरोग्य मित्रांनी जाहीर प्रवेश केला.


 
Top