भूम (प्रतिनिधी)- ग्राहक संरक्षण परिषदेच्या नवनियुक्त सदस्यांचा सत्कार धाराशिव जिल्हयाचे जिल्हाधिकारी डॉ सचिन ओंबासे यांच्या हस्ते करण्यात आला. शासनाच्या ग्राहक संरक्षण परिषदेच्या अशासकीय सदस्यपदी जिल्ह्यातून १७ सदस्यांची निवड जिल्हाधिकारी यांनी जाहीर केली. या परिषदेचे पदसिद्ध जिल्हाध्यक्ष हे जिल्हाधिकारी तर उपाध्यक्ष अप्पर जिल्हाधिकारी असतात. या अशासकीय सदस्यपदी ग्राहक पंचायत महाराष्ट्र चे धाराशिव जिल्हाध्यक्ष अजित बागडे, सचिन कवडे, शरद वडगावकर, आशिष बाबर, रवीशंकर पिसे, प्रा.पूनम तापडिया, प्रा शहाजी चेडे, डॉ गजाजन कुलकर्णी, डॉ क्षितिज गाढवे तसेच आश्रुबा घोडके, अनिल पाटील, रवींद्र शिराळ, अंकुश उबाळे, दिलीप पाटील, बालाजी जावळे, गोवर्धन भोसले, संतोष केंदळे यांच्या निवडी करण्यात आल्या आहेत. त्यांचा सत्कार जिल्हाधिकारी डॉ सचिन ओंबासे यांच्या हस्ते करण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालयात या नवनियुक्त सदस्यांचा निवडीचे पत्र देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हा पुरवठा अधिकारी श्रीमती स्वाती शेंडे, कनिष्ठ लिपिक श्रीमंत मुळे यांच्यासह पदाधिकारी हजर होते.