तुळजापूर (प्रतिनिधी)- राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिवस्वराज्य याञे निमित्ताने तिर्थक्षेत्र तुळजापूर येथे आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्याध्यक्षा सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार अमोल कोल्हे यांनी श्रीतुळजाभवानी मंदीरात जावुन देविचा कुलधर्म कुलाचार करुन दर्शन घेतले. यावेळी त्यांचे पुजेचे पौराहित्य पुजारी सुदर्शन पवार यांनी केले.
यावेळी जीवन गोरे, संजय दुधगावकर, संजय निंबाळकर, वैशालीताई मोटे, धैर्यशिल पाटील नांदुरीकर, अमर मगर, दिलीप मगर, धनंजय पाटील पदाधिकारी उपस्थितीत होते. श्रीतुळजाभवानी दर्शनानंतर बोलताना खासदार सुळे म्हणाल्या कि, मी नित्य नियमाने दरवर्षी येते दर्शन घेते. श्रीतुळजाभवानी ही कर्ती करवती असल्याने मी तीला काय मागणार. मी देविला नेहमीच प्रार्थना करते देशात, राज्यात भरपूर पाऊस पडून माझा बळीराज्याला सुखी ठेव, कारण बळीराजा सुखी असला तर सर्वकाही सुखी असतात. यावेळी महिलांनी त्यांच्या सोबत सेल्फी काढण्यासाठी मोठी गर्दी केली होती.