तेर (प्रतिनिधी) धाराशिव तालुक्यातील जागजी प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत विविध प्रकारच्या जागा रिक्त असल्याने प्राथमिक आरोग्य केंद्राला रिक्त जागेचे ग्रहण लागले आहे.
धाराशिव तालुक्यातील जागजी प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत पळसप, दाऊतपुर, काजळा, तेर ,जागजी येथे आरोग्य उपकेंद्र असून प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत पळसप ,दाऊतपुर ,काजळा येथील आरोग्य उपकेंद्रातील आरोग्य सेवक यांची पदे रिक्त आहेत. तर जागजी व काजळा आरोग्य उपकेंद्रातील आरोग्य सेविका यांची पदे रिक्त आहेत. जागजी प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत आरोग्य सेवक व आरोग्य सेविका यांची रिक्त पदे असल्यामुळे उर्वरित आरोग्य कर्मचाऱ्यावर कामाचा प्रचंड ताण पडत आहे. जागजी प्राथमिक आरोग्यं केंद्रांतर्गत रिक्त पदे तातडीने आरोग्य विभागाच्या वरिष्ठांनी भरण्याची मागणी नागरिकांतन होत आहे.