तुळजापूर (प्रतिनिधी)- श्रीतुळजाभवानी मंदीर महाव्दार परिसरात वाहने आणण्यास मज्जाव असताना श्रावण मासातील मंगळवार दि. 27 ऑगस्ट रोजी भाविकांची प्रचंड गर्दी असताना ही या दिवशी दुपारी मोठ्या प्रमाणात येथे वाहने येवुन थांबल्याने  भाविकांमध्ये या बाबतीत नाराजी व्यक्त केली जात होते. देवीदारी व्हीआयपी  व  सर्वसामान्य  गरीब भाविक असा भेदभाव का असा सवाल भाविकांमधुन केला जात आहे.

श्रीतुळजाभवानी मंदीर महाध्दार परिसरात वाहतुक कोंडी होवू नये वाहने  व्हीआयपीचे वाहने दिपक चौकातील व्हीआयपी वाहने लावण्यासाठी केलेल्या जागेत लावले जातात. मंञी, आमदार, खासदार, जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षिक सारखे जबाबदार व्हिआयपी तिथे वाहने लावुन पायी किंवा मंदीर संस्थानच्या इलेक्ट्रिक रिक्षातुन मंदीरात येतात. अगदी जेष्ट, अपंग मंडळीचे वाहने खाली सोडले जात नाहीत. माञ मंगळवार दि. 27 ऑगस्ट रोजी जवळपास सहा ते सात वाहने थेट मंदिर जवळ आल्याने हे वाहने कुणाचे त्यांना का वरच अडवले नाही? असे अनेक प्रश्न भाविक विचारात आहेत. या वाहनांवर प्रशासन करणार का असा सवाल भक्त मंडळी मधुन केला जात आहे. पोर्णिमा मंगळवार दिनी ही एका  मोठ्या व्हिआयपीचे वाहने सकाळी मंदीर परिसारात सोडले जात असल्याची चर्चा आहे.

 
Top