भूम (प्रतिनिधी)- येथील शंकरराव पाटील महाविद्यालय येथे झालेल्या तालुकास्तरीय 74 किलो वजन गटातील कुस्ती स्पर्धेत भुम येथील शंकरराव पाटील कनिष्ठ महाविद्यालयाचा विद्यार्थी आखिलेश आसिफ जमादार याने यश मिळविले आहे. त्याने भुम तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावला. तसेच पुढे त्याची धाराशिव येथे होणाऱ्या जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
तसेच इयत्ता अकरावीत शिकत असलेला आसलम मामु जमादार वय 17 वर्ष, 71 किलो वजन गटात भुम तालुक्यात प्रथम तर सुजित बारसकर 86 किलो वजन गटात प्रथम क्रमांक पटकावला. आखिलेश जमादार व असलम जमादार मौलाली तालिम संघाचे खेळाडु असून, त्यांनी हे प्रशिक्षण वस्ताद हुसेन सय्यद, आख्तर जमादार, मामु जमादार, खेळाचे शिक्षक सूर्यवंशी एम. जी. यांच्या मार्गदर्शनाखाली पुर्ण केले आहे. या यशाबद्दल अमर सुपेकर, मिसाळ सर, आसिफ भाई जमादार, पैलवान चांद सय्यद, गौस शेख, आफताब जमादार,अब्बू बागवान, दानिश शेख यांनी व शंकरराव पाटील कॉलेजचे प्राचार्य संतोष शिंदे यांच्यासह शिक्षकांनी अभिनंदन केले आहे.