ढोकी (प्रतिनिधी)- धाराशिव तालुक्यातील ढोकी येथे श्री लक्ष्मी सेवाभावी संस्थेच्या वतीने आयोजित कौशल्य विकास मार्गदर्शन कार्यक्रम दि 27 रोजी मोठया थाटात  संपन्न झाला. 

हा कार्यक्रम लक्ष्मी सेवाभावी संस्थे च्या वतीने आयोजित करण्यात आला होता  कौशल्य विकास केंद्र, सक्षम युवा, सक्षम समाजाकरीता कौशल्य युक्त महाराष्ट्र, रोजगार युक्त महाराष्ट्र युवा पीढ़ीला आत्मनिर्भर करण्याकरीता या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याचे आज उदघाटन सरोजनीताई संतोषजी राऊत यांच्या हस्ते करण्यात आल. या वेळी बोलताना डॉ सरोजनी ताई म्हणाल्या की 18 ते 45 वयाच्या विद्यार्थीनी, महिला,तसेच तरुण बेरोजगार यांनी या मोफत कोर्स चा जास्तीत जास्त लाभ घेऊन रोजगारा कडे वळावे व आपल्या सह आपले कुटुंब सक्षम करावे  तसेच आमदार राणाजगजीतसिंह पाटील, माजी आमदार सुजितसिंह ठाकुर, जिल्हाध्यक्ष संताजी चालुक्य पाटील यांच्या प्रयत्नाने धाराशिव जिल्ह्यातील ढोकी, शिराढोन, येरमाळा, तेर, बेबळी, आसु, या ठिकाणी विविध कोर्सेसचे प्रशिक्षण  केंद्र सुरु करण्यात आले आहे असे डॉ.सरोजनीताई संतोष राऊत यांनी आवर्जुन सांगितले. 

या पूर्वी हि डॉ. सरोजनी ताई राऊत यांनी कळंब व धाराशिव तालुक्यात महिलांसाठी वेगवेगळ्या योजना राबवत महिलांना सक्षम बनवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. या कौशल्य विकास केंद्र मार्गदर्शन कार्यक्रमात मोफत टॅली प्रवेश नोंदणी कार्यक्रम घेण्यात आला. प्रमोद महाजन ग्रामीण विकास कौशल्य केंद्र यांच्यामार्फत ढोकी येथे वायव्ही एस स्किल सेंटर सुरु करण्यात आले आला. तरी जास्तीत जास्त सुशिक्षित तरुण -तरुणी - महिला यांनी या प्रशिक्षण केंद्रात आपले प्रवेश घ्यावे असे आवाहन केले. तसेच या कार्यक्रमात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत ज्यांचे फॉर्म ऑनलाईन करायचे राहिले आहेत. अशांचे लाडकी बहीण योजनेचे फॉर्म ऑनलाईन करण्यात येणार आहेत व शासनाच्या विविध योजना संदर्भात सखोल असं मार्गदर्शन करण्यात आले. या वेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून वसंतराव काळे कला महाविद्यालयचे प्राचार्य डॉ. हरिदास फेरे, उपसरपंच अमोल समुद्रे, भाजप तालुका उपाध्यक्ष प्रमोद देशमुख, जेष्ठ नेते झुंबर आबा बोडके,किशोर तिवारी,विलास रसाळ,गुणवंत सुतार, पत्रकार सुरेश कदम,दौलत गाढवे,प्रतीक पाटील, महिला प्रभाग संघाच्या अध्यक्षा सविताताई सुतार, पोलिस पाटील राहुल वाकुरे, संजय पवार, लहू शिंदे, गणेश पवार, बालाजी बोडके, ढगे सर, अक्षय सर, तसेच ढोकी व परिसरातील तरुण - तरुणी, सुशिक्षित बेरोजगार, व महिला मोठया संख्येने उपस्थित होते.

 
Top