तुळजापूर (प्रतिनिधी)- तालुक्यातील सावरगाव येथील जागृत नागनाथ महाराजांचा यात्रा महोत्सव दि.4 ऑगस्ट गेल्या पासून सुरू आहे,9 रोजी गावातील प्रमुख मार्गावरून मंदिराचे मुख्य पुजारी तथा खरगा गण सद्गुरु स्वामी महाराज आणि नागनाथ महाराजांच्या पालखीची भव्य मिरवणूक होणार आहे. तत्पूर्वी नागपंचमीच्या आदल्या दिवशी दि.8 रोजी नागा चतुर्थी उपवासानिमित्त माहेरवाशींनी आणि महिलांनी वारूळ पूजनासाठी महिलांनी नागनाथ महाराज देवस्थान परिसरात मोठी गर्दी केली होती.
पारंपरिक नागपंचमीचे गाणी गात महिलांनी फेर धरला होता, सावरगाव नागनाथ महाराज यात्रेनिमित्त नागपाल विंचू पाच दिवस एकत्रित वास्तव करतात यात्रेला पारंपारिकतेचा साज असल्याने यात्रा आगळीवेगळी समजली जाते. यात्रा महोत्सव यशस्वी पार पाडण्यासाठी समस्त ग्रामस्थ परिश्रम घेत आहेत. येणाऱ्या भाविकांना महाप्रसाद वाटप भावाचे उपवासानिमित्त दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना माजी सैनिक दत्तात्रय लिंगफोडे, अरविंद गोडसे यांच्यावतीने शाबू खिचडीच्या महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. शंभू महादेव दूध डेरी चे हनुमंत गाभणे आणि मसाला दूध वाटप केले. दोस्ती ग्रुपचे केशव गाभणे, अमोल पवार, मनोज डोके, लक्ष्मण धडके, शहीद सय्यद, राहुल तानवडे, पिंटू धडके, अमोल माने यांच्यावतीने केळी वाटप करण्यात आली. तर अशोक आप्पा डोके आणि सहकाऱ्यांच्या वतीने राजगिरा लाडूचे वाटप करण्यात आले. श्री. क्लासमेट ग्रुप कडून पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती.