धाराशिव (प्रतिनिधी) -  येथील रामकृष्ण परमहंस महाविद्यालयात श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे संस्थापक शिक्षणमहर्षी,दलित मित्र डॉ. बापूजी साळुंखे यांच्या 37व्या स्मृतीदिनानिमित्त महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ . जयसिंगराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली विविध कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

सर्वप्रथम  डॉ .बापूजी साळुंखे आणि संस्थामाता सुशिलादेवी साळुंखे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून बापूजींच्या प्रतिमेचे पूजन महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ . सावता फुलसागर सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा.डॉ. केशव क्षीरसागर यांच्या शुभहस्ते करण्यात आले. स्मृतिदिनाचे औचित्य साधून मराठी विभागातील प्रा . डॉ.स्वप्नील बुचडे यांनी उपस्थिती विद्यार्थी व सर्व गुरुदेव कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले  यावेळी डॉक्टर बुचडे यांनी शिक्षण महर्षी डॉक्टर बापूजी साळुंखे यांच्या जीवनावर सविस्तर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला. बापूजींनी घेतलेल्या कष्टामुळेच आज श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचा वटवृक्ष बहरला आहे असे ते यावेळी म्हणाले. याप्रसंगी राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि राष्ट्रीय क्षात्र सेना विभाग यांच्या वतीने वृक्षारोपण करण्यात आले. सदर कार्यक्रम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ .जयसिंगराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आले.

 
Top