तुळजापूर (प्रतिनिधी)- तालुक्यातील काटी येथे बाळूमामाच्या पालखीची मिरवणूक गुरुवार दि. 22 ऑगस्ट रोजी भव्य मिरवणूक काढण्यात आली. सांयकाळी पाच वाजता पालखी मिरवणूक प्रांरभ झाला. मिरवणूक दरम्यान हजारो बाळुमामाच्या भक्ताने दर्शन घेतले. बाळूमामाच्या पालखीच्या सोहळ्याचे आयोजन काटी गावचे काका महाराज लेंगरे बाळूमामाच्या मंदिराचे मुख्य पुजारी यांनी केले होते.
बाळूमामाच्या पालखी सोहळ्यामध्ये पाच मानाच्या काठ्या होत्या. तसेच बाळूमामाच्या पालखी सोहळ्यामध्ये अनेक गावचे ढोल वाद्य बाळूमामाच्या पालखी समोर वाजवत होते. बाळूमामाच्या पालखी मिरवणूक मंदिर पासून पाच वाजता सुरुवात झाली व संपूर्ण काठी गावांमधून ही पालखी मिरवणूक काढण्यात आली. पालखी सोहळा समाप्त झाल्यानंतर बाळुमामाची मंदिर मध्ये आरती करण्यात आली. त्यानंतर आलेल्या सर्व बाळुमामाच्या भक्तांना प्रसादाचे वाटप करण्यात आले.