तुळजापूर (प्रतिनिधी) -  बदलापूर येथील दोन लहान चार वर्षीय चिमुरडीवर झालेल्या अत्याचार प्रकरणी मौजे इटकळ येथे तमाम ग्रामस्थ व महाविकास आघाडीच्या वतीने शनिवार दि.24 ऑगस्ट रोजी बंद आंदोलन करून निषेध व्यक्त करण्यात आला. महामार्गावरील सर्व व्यापाऱ्यांनी दुकान हॉटेल बंद ठेऊन आंदोलनास पाठिंबा दिला. इटकळ औट पोस्टचे पोलीस हेड कॉन्स्टेबल कोळी यांना माजी जिल्हा परिषद सदस्य अझर मुजावर, अरूण दळवे, अब्दुल शेख व ग्रामस्थांच्या वतीने निवेदन देण्यात आले.

यावेळी दिनेश सलगरे व अरूण दळवे यांनी मनोगत व्यक्त करतांना संबंधित बदलापूर येथील दोन लहान बालिकेवर जो माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली अशा पाशवी अत्याचार करणाऱ्या आरोपीला तात्काळ फाशी देण्यात यावी. अन्यथा भविष्यात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा दिला. यावेळी या बंद आंदोलन मोर्चास माजी जिल्हा परिषद सदस्य अझर मुजावर, माजी पंचायत समिती सदस्य अरूण दळवे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस अब्दुल शेख, लियाकत खुदादे, दयानंद गायकवाड, दादा भोपळे, शिवसेना तालुका उपप्रमूख अनिल भोपळे, कादिर शेख, जावल शेख, काळू जाधव, सिद्धेश्वर हंनुरे, रामराजे पाटील, गोटू एकंडे, अफसर शेख, असलाम भांबरते, अफजल मुजावर, पत्रकार नामदेव गायकवाड, केशव गायकवाड , दिनेश सलगरे यांच्यासह बहुसंख्य ग्रामस्थ उपस्थित होते.

 
Top