धाराशिव (प्रतिनिधी) - डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वतीने धाराशिव उपपरिसरासाठी देण्यात येणारा जीवन साधना पुरस्कार घोषित करण्यात आला आहे. प्रख्यात साहित्यिक तथा शिक्षणतज्ञ प्रा. वेदकुमार रघूत्तमदास वेदालंकार यांना यंदाचा हा पुरस्कार घोषित करण्यात आला आहे, अशी माहिती कुलसचिव डॉ प्रशांत अमृतकर यांनी दिली.

 विद्यापीठाच्या वतीने गठीत करण्यात आलेल्या समितीने सदर निवड केली आहे. शिवाजी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ माणिकराव साळुंखे यांच्या हस्ते येत्या १६ ऑगस्ट रोजी विसाव्या वर्धापनदिनी पुरस्कार वितरण करण्यात येईल. मा कुलगुरू डॉ विजय फुलारी यांच्या अध्यक्षतेखाली  विद्यापीठ उपपरिसरच्या सभागृहात हा कार्यक्रम होणार आहे.

 
Top