तुळजापूर (प्रतिनिधी)- तुळजापूर शहर वासियांच्या गळ्यातील ताईत बनलेले नाशीक विभागीय आयुक्त महसूल विभाग डॉ.प्रविणजी गेडाम यांनी शनिवार दि. 17 रोजी सहकुंटुंब सहपरीवार श्री तुळजाभवानी देविचे दर्शन घेतले. यावेळी गेडाम यांच्या सौभाग्यवती, भाऊ, भावजय यांनी दर्शन केले.
श्रीतुळजाभवानी दर्शनानंतर माजी नगराध्यक्ष सचिन रोचकरी, जिल्हा दुध संघाचे चेअरमन बाळासाहेब शिंदे, प्रा. संभाजी भोसले, पुजारी मंडळाचे माजी अध्यक्ष किशोर गंगणे यांनी त्यांचे स्वागत करुन सत्कार केला. या नंतर तुळजापूर विकास आराखड्याबाबत माजी नगराध्यक्ष सचिन रोचकरी यांनी त्यांना माहिती दिली. तसेच यापूर्वी त्यांच्या कारकिर्दीत झालेल्या तुळजापूर विकास प्राधिकरणाच्या माध्यमातुन झालेल्या विकास कामे भवानी कुंड,108 भक्त निवासाची कामाची पहाणी केली. यावेळी स्ञी शक्तीदारी तुळजाई स्त्रीशक्ती पुरस्कार, शांकभरी नवराञ कला क्रिडा पुरस्कार अद्याप न चालू न केल्याबद्दल खंत व्यक्त केली. तसेच भवानी तिर्थकुंड व साहित्य संग्रहालय कायम स्वरुपी सुरु ठेवले जात नसल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. बीओटीतुन हे विकास कामे केले असते तर कमीत कमी भाविकांच्या सेवेत असले असते असे स्पष्ट केले. यावेळी त्यांच्या स्वागतासाठी मोठी गर्दी शहरवासियांनी केली होते.