तुळजापूर (प्रतिनिधी)- बालाजी अमाईन्स आणि बालाजी स्पेशालिटी केमिकल्स यांचे कडून सीएसआर अंर्तगत धाराशिव जिल्हयातील 23 शाळंना स्वातंत्र्य दिनाच्या पुर्वसंध्येला शालेय उपयोगी साहित्याचे वितरण बुधवार 14. रोजी बालाजी अमाईन्स फॅक्टरी तामलवाडी येथे करण्यात आले.
जिल्हाधिकारी सचिन ओंबासे व धाराशिवचे मुख्य कार्यकारी अधिकारी मैनक घोष यांचे हस्ते शालोपयोगी साहित्याचे वितरण करण्यात आले. यावेळी तुळजापुर तालुक्याचे तहसिलदार अरविंद बोळंगे, बालाजी अमाईन्सचे व्यवस्थापकिय संचालक डी. राम रेडडी, सीएसआर प्रमुख मल्लिनाध बिराजदार, आर. एस. शास्त्री उपस्थित होते.
बालाजी अमाईन्स आणि बालाजी स्पेशालिटी केमिकल्स यांचे कडून सीएसआर अंर्तगत धाराशिव जिल्हयातील 23 शाळंना शालोपयोगी साहित्याचे वितरण करण्यात आले. 5 शाळांना 7 स्मार्ट टिव्ही, 2 शाळांना 2 संगणक, 3 शाळांना आरो मशीन 100 एल एच पी चे 3 आरो मशीन, 1 शाळेस विज्ञानप्रयोग शाळा साहित्य, 12 शाळांना 300 बेंच या साहित्याचे जिल्हाधिकारी सचिन ओंबासे व मुख्य कार्यकारी अधिकारी मैनक घोष यांचे हस्ते वाटप करण्यात आले. या कार्यक्रम प्रसंगी बोलताना जिल्हाधिकारी सचिन ओंबासे यांनी धाराशिव जिल्हयात बालाजी अमाईन्सच्या वतीने सीएसआर अंर्तगत जिल्हापरिषद शाळांना स्मार्ट टिव्ही व संगणक बेंच ची मदत मिळाल्यामुळे शाळांची सोय होणार आहे. बालाजी अमाईन्सच्या सीएसआर कामाचे कौतुक केले. या प्रसंगी सर्व शाळांचे शिक्षक, विद्यार्थी, पालक, मुख्याध्यापक, परिसरातील नागरीक उपस्थित होते. या कार्यकमाचे सुत्रासंचलन विठठल नरवडे यांनी केले. याकार्यक्रमास बालाजी अमाईन्सचे मारूती सावंत, विनय दुर्गम, डी. पी. गायकवाड, विनोद चुंगे, दत्तप्रसाद सांजेकर, बसवराज अंटद, अमोल गुंड उपस्थित होते.