उमरगा (प्रतिनिधी)- पश्चिम बंगाल येथील महिला डॉक्टर यांच्यावर झालेल्या बलात्कार व हत्येप्रकरणी उमरगा इंडियन मेडिकल असोसिएशनच्या वतीने निषेधात्मक मोर्चा काढून “न्याय द्या, न्याय द्या, गुन्हेगारांना फाशीची शिक्षा द्या“ अशा घोषणा देण्यात आल्या. या प्रकारणातील सर्व आरोपीना लवकरात लवकर पकडून त्यांना फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणीचे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले.
पश्चिम बंगालमधील कलकत्ता येथील महिला डॉक्टर या स्वतःची ड्युटी संपवून रात्री आराम करत असताना, त्यांच्यावर सामूहिक बलात्कार करून नंतर हत्या करण्यात आली आहे. या गंभीर प्रकरणी उमरगा डॉक्टर्स या घटनेचा तीव्र निषेध करत शनिवारी(दि.17) मोर्चा काढण्यात आला. यावेळी “न्याय द्या, न्याय द्या, गुन्हेगारांना फाशीची शिक्षा द्या“ अशा घोषणा देण्यात आल्या. या प्रकारणातील सर्व आरोपीना लवकरात लवकर पकडून त्यांना फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी निवेदन मध्ये करण्यात आली आहे. तसेच डॉक्टरांना हॉस्पिटलमध्ये काम करताना कुठलीही भीती वाटली नाही पाहिजे या पद्धतीचे कठोर कायदे शासनाने आणावेत व देशातील सर्वच डॉक्टर महिलांच्या सुरक्षे संदर्भातील उपाय योजना कठोर करण्यात याव्यात अशी मागणी करत करण्यात आली आहे. यावेळी मेडिकल व ड्रग्ज असोसिएशन ने या मोर्चात सहभागी होत आपला पाठिंबा जाहीर केला. निवेदनावर उमरगा मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. अनंत मुगळे, सचिव एन. डी. बिराजदार, डॉ. विजय पाटील, डॉ उदय मोरे, डॉ. दत्तात्रय थिटे, डॉ. सुभाष वाघमोडे, डॉ. कपिल महाजन, डॉ. श्रीनिवास जाधव, डॉ. नचिकेत इनामदार, डॉ. दीपक चव्हाण, डॉ. सुचेता पोफळे, डॉ. दीपा मोरे, डॉ. शुभांगी महाजन, डॉ. अशा कदम, डॉ. स्वाती पाटील, डॉ. मनीषा शिंदे, डॉ. अनिता बाबरे, डॉ. मैत्रयी तावशीकर, डॉ. अर्चना विशवेकर, डॉ. योगिता स्वामी, डॉ. चैतन्या काबरा, डॉ. मल्लिकार्जुन खिचडे आदीसह मेडिकल व ड्रग्ज असोसिएशनचे पदाधिकारी, सदस्य तसेच वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.