धाराशिव (प्रतिनिधी) - इस्लाम धर्माचे संस्थापक हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या जयंती निमित्त  उस्मानाबाद येथे प्रत्येक वर्षी शांती, सद्भाव वृध्दिंगत करण्यासाठी विविध उपक्रम राबविले जातात. तसेच शहरातील मुख्य रस्त्यावरून जुलूस (मिरवणूक) काढली जाते. 2024 च्या ईद ए मिलाद जुलूस कमिटीची बैठक दि.11 ऑगस्ट रोजी रात्री 9.30 वाजता दर्गा मस्जिद मध्ये ज्येष्ठ मौलाना इस्माईल खारी यांच्या उपस्थितीत घेण्यात आली.

मौलाना जुलखरनैन पठाण यांनी पवित्र कुराण पठणाने बैठकीस सुरुवात झाली. बैठकीचे प्रास्ताविक मौलाना जाफर अली खान यांनी केले. माजी अध्यक्ष अजहर पठाण यांनी मागील वर्षीचा जमा खर्चचा हिशोब सादर करून सहकार्य करणाऱ्यांचे आभार मानले.  माजी नगराध्यक्ष खलिफा कुरेशी यांनी कमिटीच्या अध्यक्षपदासाठी उस्मानाबाद येथील ज्येष्ठ तथा धार्मिक अधिष्ठान असलेले नेते सय्यद खलील यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला. त्यांना वाजीद खान पठाण, कलीम कुरेशी, बिलाल तांबोळी, मौलाना जाफर आली खान यांनी अनुमोदन दिले. सय्यद खलील यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. या कमिटीच्या कार्यकारिणीत आमेर पठाण, उपाध्यक्ष शहाबाज पठाण, कलीम कुरेशी सचिव, निहाल वाजीद शेख कोषाध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यात आले. विस्तारित कार्यकारिणी येत्या गुरुवारी गठित करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 

यावेळी मौलाना मोहम्मद जाफर आली खान, मौलाना इस्माईल खारी, मौलाना अफजल निजामी मौलाना अस्लम, मौलाना तौफिक पठाण मौलाना बिलाल शत्तारी, मौलाना इर्शाद रजा, माजी नगराध्यक्ष खलिफा कुरेशी, वाजीद खान पठाण, बिलाल तांबोळी,अफरोज पिरजादे,बाबा मुजावर,अजहर पठाण,जाफर मुजावर, इर्शाद कुरेशी,कलीम कुरेशी, असलंम मुजावर, इर्शाद मुजावर, शोएब सय्यद, शाहनवाज सय्यद, अरबाज नदाफ, अरबाज नाईकवाडी, इश्तीयाक कुरेशी, इर्शाद सय्यद, नुर शेख आदी उपस्थित होते. शेवटी मौलाना अफजल निजामी यांनी दुवा पठण करून उपस्थितांचे आभार मानले.


 
Top