धाराशिव  (प्रतिनिधी) - धाराशिव शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या स्त्रोत्रापासून पाणी उचलण्यास तांत्रिक अडचण निर्माण झाली आहे. त्यामुळे यापुढे शहरातील नागरिकांना करण्यात येणारा   पाणी पुरवठा एक दिवस उशिराने करण्यात येणार आहे. शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या ठिकाणाहून पाणी उचलण्यासाठी तांत्रिक बिघाड निर्माण झाला आहे. त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा व होणाऱ्या पाणी टंचाईवर मात करावी, असे आवाहन मुख्याधिकारी वसुधा फड यांनी केले.

 
Top