धाराशिव (प्रतिनिधी)-शिवराज्याभिषेक सोहळा समिती धाराशिव यांचे वतीने मा. जिल्हाधिकारी साहेब धाराशिव यांचे मार्फतीने मा. महामहीम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना बांगलादेशातील भारतीय वंशाच्या हिंदू बौद्ध पारशी ख्रिश्चन व इतर सर्वच धर्मीय नागरिकांची सुरक्षा व सुटके बाबत निवेदन सुपूर्द करण्यात आले.

सध्या भारताच्या शेजारी असलेल्या बांगलादेश मध्ये अंतर्गत उठाव झालेला आहे.संपूर्ण बांगलादेशामध्ये अराजकतेची परिस्थिती निर्माण झालेली आहे. बांगलादेशामध्ये हिंसाचारामध्ये आत्तापर्यंत हजारो नागरिकांचा बळी गेलेला आहे. बांगलादेश मध्ये राहणाऱ्या भारतीय वंशाच्या नागरिकांवर हल्ल्यांच्या प्रमाणात प्रचंड वाढ झालेली आहे. भारतीय वंशाच्या नागरिकांची हत्या बलात्कार लूट हिंसाचार करून त्यांच्यावर अन्वन्वीत अत्याचार सुरू असल्याच्या बातम्या प्रसारमाध्यमांमध्ये आणि सोशल मीडियामध्ये प्रचंड प्रमाणात प्रसारित होत आहेत. खास करून भारतीय वंशाची प्रार्थनास्थळे विद्यार्थी महिला यांना बांगलादेशी कट्टरवाद्यांकडून लक्ष करण्यात येत आहे.भारतीय वंशाच्या जान माल वित्त यांचे अस्तित्व धोक्यात आलेले आहे.संपूर्ण जगभरातून बांगलादेश मधील नागरिकांच्या सुरक्षेची चिंता व्यक्त करण्यात येत आहे.हजारो भारतीय वंशाचे विद्यार्थी शिक्षणासाठी बांगलादेशमध्ये वास्तव्यास आहेत त्यांच्यावर देखील हल्ले करून त्यांना ठार मारण्याचे प्रमाण वाढलेले आहे. संपूर्ण भारतीय जनतेला आपल्या बांगलादेश मधील भारतीयांच्या सुरक्षेची काळजी लागलेली आहे. तसेच बांगलादेश मधील भारतीय वंशाच्या लोकांच्या सुरक्षेवरून भारतीय जनतेमध्ये प्रचंड असंतोष व आक्रोश आहे. भारतीय जनतेच्या या असंतोषाचा व आक्रोशाचा विचार करून भारत सरकारने तातडीने पावले उचलून बांगलादेश मधील भारतीय वंशाच्या लोकांची सुरक्षा प्राधान्यक्रमाने करून त्यांना सुरक्षित स्थळी हलवणे अथवा भारतामध्ये परत आणण्यासाठी अत्यंत तातडीने पावले उचलणे गरजेचे आहे. भारत सरकारची ती जबाबदारी आहे.या कामी शिवराज्याभिषेक सोहळा समिती धाराशिव भारत सरकारच्या संपूर्ण पाठीशी उभी राहण्यास तयार आहे. 

तरी संपूर्ण भारतीयांच्या वतीने आम्ही निवेदन देतो की,बांगलादेशमध्ये अडकलेल्या भारतीय वंशाच्या लोकांची सुरक्षा त्यांच्या प्रार्थना स्थळांची सुरक्षा करण्यासाठी आंतरराष्ट्रीय दबाव आणून पीडित लोकांची मदत करून त्यांना सुरक्षित स्थळी हलवण्यासाठी अथवा भारतात परत आणण्यासाठी भारत सरकारने तातडीने व शीघ्रगतीने प्रयत्न करावेत ही नम्र विनंती.या निवेदनाच्या प्रती मा.जिल्हाधिकारी धाराशिव यांच्यामार्फत मा. पंतप्रधान साहेब भारत सरकार नवी दिल्ली, मा. गृहमंत्री साहेब भारत सरकार नवी दिल्ली,मा. संरक्षण मंत्री साहेब भारत सरकार नवी दिल्ली,मा. परराष्ट्रमंत्री साहेब भारत सरकार नवी दिल्ली,मा. मुख्यमंत्री साहेब महाराष्ट्र राज्य नवी मुंबई यांना त्यांच्या प्रति पाठवण्यात आलेल्या आहेत. यावेळी शिवराज्याभिषेक सोहळा समिती धाराशिव चे अध्यक्ष श्री गौरव बागल उपाध्यक्ष श्री आकाश कोकाटे शहर उपाध्यक्ष श्री आकाश भोसले तालुकाध्यक्ष श्री अमोल सिरसट  ऑटोरिक्षा अध्यक्ष श्री अजिंक्य तनमोर एडवोकेट संजय शिंदे गुंडोपंत जोशी दत्तात्रय साळुंके दत्ता जावळे शुभम लोकरे ज्योतीराम काळे प्रभात मुंडे व्यंकटेश पडिले बालाजी खोचरे भैरवनाथ रणखांब समीर शेख इत्यादी सह बहुसंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते हजर होते.

 
Top