परंडा (प्रतिनिधी)- सहारा चारिटेबल ट्रस्ट ही एक राष्ट्रीय सामाजिक संस्था आहे. ही संस्था देशातील उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींना विविध पुरस्कार देऊन सन्मानित करते. फुले शाहू आंबेडकर विद्वत सभेचे राज्य समन्वयक डॉक्टर शहाजी चंदनशिवे हे या राष्ट्रीय संस्थेशी निगडित असल्याने त्यांनी राखी देशमुख यांनी धाराशिव जिल्ह्यामध्ये महिला चळवळीमध्ये विविध माध्यमातून उल्लेखनीय कार्य केल्यामुळे त्यांची शिफारस केली होती. त्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय सेवारत्न पुरस्कार देऊन या संस्थेने गौरविण्यात आले होते.

त्यांना मिळालेल्या या राष्ट्रीय पुरस्काराबद्दल मान्यवरांच्या हस्ते त्यांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय सेवा रत्न पुरस्कार देऊन राखी देशमुख यांना सन्मानित करण्यात आले आहे.

 
Top