परंडा (प्रतिनिधी)- शहरातील प्रामाणिक व निष्ठावंत कार्यकर्ता मागील अनेक वर्षापासून सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे माजी आमदार राहुल मोटे यांचे कट्टर समर्थक गनीभाई हावरे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार अल्पसंख्यांक विभाग च्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड केल्याचे पत्र राष्ट्रवादी युवक काँग्रेस चे प्रदेशाध्यक्ष महेबूब भाई शेख व माजी आमदार राहुल मोटे यांच्या हस्ते देण्यात आले.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाची शिवस्वराज यात्रेतील कार्यक्रमात संसद रत्न खासदार सुप्रियाताई सुळे, खासदार अमोल कोल्हे ,सामाजिक न्याय विभागाचे प्रदेश अध्यक्ष पंडित कांबळे, विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे , जिवन गोरे, सहभागी झाले आहेत या कार्यक्रमात हे पत्र देण्यात आले.
यावेळी महिला आघाडी विभागीय अध्यक्ष सौ.वैशालीताई मोटे, दादासाहेब पाटील, तात्यासाहेब गोरे, रणजीत मोटे, राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष राहुल बनसोडे, राष्ट्रवादी युवक जिल्हाध्यक्ष शेखर घोडके, परंडा तालुका अध्यक्ष एड. संदीप खोसे पाटील, भाऊसाहेब खरसडे, शहराध्यक्ष श्रीहरी नाईकवाडी, नसीर शहाबर्फीवाले, ऍड.सुजित देवकते, डॉ. नवनाथ वाघमोडे, धनंजय मोरे, धनंजय हांडे, हनुमान कोलते, घनश्याम शिंदे, नंदू शिंदे, खय्यूम तुटके, अरबाज पठाण, जिशान शहाबर्फीवाले, सौ.प्रशाला धेंडे, गोरख देशमाने यांच्या सह तालुक्यातील व शहरांतील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. हावरे यांच्या निवडी बद्दल शहरातून व तालुक्यातून अभिनंदन होत आहे.