परंडा (प्रतिनिधी) -शहरातील युवा कार्यकर्ता सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य असणारे खय्यूम तुटके यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या युवक शहर अध्यक्षपदी निवड केल्याचे पत्र राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महेबूब भाई शेख व भूम परंडा वाशी मतदारसंघाचे माजी आमदार राहुल मोटे यांच्या हस्ते देण्यात आले.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाची शिवस्वराज यात्रेतील कार्यक्रमात संसद रत्न खासदार सुप्रियाताई सुळे , खासदार अमोल कोल्हे ,सामाजिक न्याय विभागाचे प्रदेश अध्यक्ष पंडित कांबळे, विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे, जिवन गोरे, सहभागी झाले होते या कार्यक्रमात हे निवडीचे पत्र देण्यात आले.
यावेळी महिला आघाडी विभागीय अध्यक्ष सौ.वैशालीताई मोटे, दादासाहेब पाटील, तात्यासाहेब गोरे, रणजीत मोटे, राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष राहुल बनसोडे, राष्ट्रवादी युवक जिल्हाध्यक्ष शेखर घोडके, परंडा तालुका अध्यक्ष एड. संदीप खोसे पाटील, भाऊसाहेब खरसडे, शहराध्यक्ष श्रीहरी नाईकवाडी, नसीर शहाबर्फीवाले, ॲड.सुजित देवकते, डॉ.नवनाथ वाघमोडे, धनंजय मोरे, धनंजय हांडे ,हनुमान कोलते, गनी हावरे, घनश्याम शिंदे,नंदू शिंदे, अरबाज पठाण, जिशान शहाबर्फीवाले, सौ.प्रशाला धेंडे, गोरख देशमाने यांच्या सह तालुक्यातील व शहरांतील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.खय्यूम तुटके यांच्या निवडी बद्दल शहरातून व तालुक्यातून अभिनंदन होत आहे.