धाराशिव (प्रतिनिधी)- केंद्र शासनाने 20 एप्रिल 2024 चे परिपत्रक रद्द करण्यासंदर्भात दिल्ली येथे बैठक घेणार असल्याचे केंद्रीय कृषी मंत्र्यांनी सांगितले आहे. मात्र मागील वाईट अनुभव पाहता हे परिपत्रक रद्द होवून जुन्या परिपत्रकाप्रमाणे विमा नुकसान भरपाई देईपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचे अनिल जगताप यांनी सांगितले. 

परळी येथे राज्य कृषी प्रदर्शनात केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंह चव्हाण यांनी महाराष्ट्रात पीकविमा वाटपात अडचण व परिपत्रक रद्द करण्यासंदर्भात दिल्ली येथे बैठक घेवू, असे जाहीर केले. परिपत्रक रद्द होवून जुन्या परिपत्रकाप्रमाणे नुकसान भरपाई मिळेपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचे अनिल जगताप यांनी म्हटले आहे. तसेच सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान देताना ई-पीक पाहणीची अट रद्द केल्याचे स्वागत आहे. 1 ऑगस्टला मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे मागणी केली होती. 

तसेच रखडलेले शेतकऱ्यांचे दुष्काळी अनुदान त्यांच्या खात्यावर पडण्यास सुरूवात झाली आहे हे आंदोलनाचे यश असल्याचे जगताप यांनी सांगितले. जगताप यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन सुरू असून, धाराशिव, तुळजापूर, उमरगा येथे धरणे आंदोलन पार पडले आहे. पुढील आंदोलन 29 ऑगस्ट रोजी लोहारा तहसील कार्यालयासमोर होणार आहे. 

 
Top