धाराशिव (प्रतिनिधी)-  सर्वोच्च न्यायालयाने एससी व एसटी आरक्षणाच्या उपवर्गीकरणासंदर्भात सुचित केले आहे. याची तत्काळ अंमलबजावणी करावी, या मागणीसाठी कळंब तालुक्यातील भोसा येथील युवकाने रविवारी पहाटे रेल्वेखाली उडी घेवून आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी युवकाने चिठ्ठी लिहून ठेवली आहे. 

अनुसूचित जाती व जमातीच्या आरक्षणाचे उपवर्गीकरण करावे, असे सर्वोच्च न्यायालयाने सूचित केले होते. उपवर्गीकरण तातडीने करून त्याची अंमलबजावणी करावी, अशी मागणी जोर धरत आहे. याच मागणीसाठी कळंब तालुक्यातील भोसा येथील अविनाश नागेश खंडागळे (19) या युवकाने गडदेवधरी पुलाजवळ रेल्वेखाली आत्महत्या केली. तत्पूर्वी त्याने कोर्टाने आरक्षण उपवर्गीकरणाच्या दिलेल्या निर्णयाची तत्काळ अमंलबजावणी करावी, यासाठी आत्महत्या करत आहे. जय लहुजी, अशा आशयाची चिठ्ठी लिहिली. आपली दुचाकी त्याने पुलावर सोडून रेल्वेखाली झोकून दिले. यामुळे त्याचा मृतदेह छिन्नविछिन्न अवस्थेत रविवारी सकाळी आढळला. अविनाश खंडागळे यचे शहरातील एका महाविद्यालयात बीकॉम द्वितीय वर्षात शिक्षण सुरू होते. त्याच्या पश्चात आई, वडील, मोठा भाऊ, लहान बहीण असा परिवार आहे. या प्रकरणी पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आले आहे.

 
Top