तुळजापूर (प्रतिनिधी)- टपाल विभागातर्फ देवकुरळी ता तुळजापूर  येथे लेक लाडकी व लाडकी बहीण अकाउंट काढण्यासाठी  व पोस्ट ऑफिसचे विविध योजना प्रत्येकाच्या घरोघरी पोहोचवण्यासाठी डाक चौपाल हा कार्यक्रम संपन्न झाला. 

सकाळी नरेंद्र बोरगावकर शाळेतील मुलांनी गावात प्रभात फेरी काढून आली. या प्रभात फेरीमध्ये  डाक सेवा- जनसेवा, सुकन्या समृद्धी-देशाची प्रगती, महिला सन्मान-देशाचा अभिमान, बेटी पढाओ -बेटी बचाओ, इंडिया पोस्ट- सबका दोस्त अशा घोषणा देण्यात आल्या.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक अनिल जाधव डाक निरीक्षक तुळजापूर यांनी पोस्ट ऑफिस मधील विविध योजनेबद्दल सविस्तर माहिती दिली. सदरील कार्यक्रमासाठी गावचे पोलिस पाटील श्री जाधव, सोसायटीचे चेअरमन अभिजित जाधव, चंद्रकांत जाधव, नरेंद्र बोरगावकर विद्यालयाचे मुख्याध्यापक व सर्व कर्मचारी वर्ग ,गावातील बचत गटाचे महिला व अंगणवाडी सेविका तसेच गावातील सर्व नागरिक उपस्थित होते. 

या डाक मेळाव्यात लेक लाडकी व लाडकी बहीण तसेच पोस्टातील विविध प्रकारचे नवीन 100 खाते काढण्यात आले. या कार्यक्रमाला जनसंपर्क अधिकारी  श्री बी सी माळी यांनी पोस्ट खात्यातील विविध योजने विषयी सविस्तर माहिती उपस्थित विद्यार्थी महिला व गावकरी यांना देण्यात आला. 

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन अमोल देशमुख सब पोस्टमास्तर माळुंब्रा यांनी केल. तर तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी देवकुरुळी येथील शाखा डाकपाल श्रीमती पतंगे, डाक आवेक्षक प्रवीण भद्रशेट्टी, रोहन ढोणे, इनायत  पठाण, प्रणव सुरवसे, पांडुरंग चौगुले, पांडुरंग कुंभार,  आधार ऑपरेटर  समर्थ घुगे, लक्ष्मण लोमटे आदि  उपस्थित होते.

 
Top