जळकोट (प्रतिनिधी) - आलियाबाद ता. तुळजापूर येथील श्री संतोष मोतीराम चव्हाण यांची संत सेवालाल महाराज बंजारा व लमाण तांडा समृद्धी योजनेंतर्गत ग्रामपंचायती कडून प्राप्त झालेल्या कामाचा प्राधान्यक्रम व निकड लक्षात घेऊन कामाची निवड करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद धाराशिव यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समितीमध्ये अशासकीय सदस्य म्हणून तीन वर्षाकरिता बंजारा समाजाचे दोन प्रतिनिधी पैकी संतोष मातोरीम चव्हाण मु.पो. आलियाबाद ता. तुळजापूर यांची नियुक्ती झाली आहे.

भटक्या विमुक्त जाती जमातीच्या लोकांना उदरनिर्वाहासाठी आजही भटकंती करावी लागते. ज्या समाजाला केवळ जगण्यासाठीच त्यांचे प्रयत्न अपुरे ठरतात. किंवा योग संधी मिळत नाही. व भटकंती हा त्यांच्या जीवनाचा स्थायीभाव बनलेला आहे. तो समाज आपल्या आपत्यांना परिवर्तनाला अनुकूल बनविणारे शिक्षण कसे देऊ शकणार. शिवाय या समाजाच्या दुर्बल पार्श्वभूमीवर जन्मलेल्या बालकावर शैक्षणिक संस्कार कसे घडविणार अशी मुले खऱ्या अर्थाने जन्मलेले आहेत म्हणून त्यांना प्रथम त्यांच्या वातावरणातून अलग काढून केवळ शैक्षणिकच नव्हे तर समूह जीवन जगण्यापासून ते जागतिक प्रवाहामध्ये आणण्यापर्यंतचे संस्कार संतोष चव्हाण यांनी संस्थेच्या माध्यमातून काम करण्याचे प्रयत्न केले. कोरोना काळात धाराशिव जिल्ह्यातील वाड्या तांड्यावर जाऊन समाज उपयोगी काम केले. संतोष चव्हाण यांच्या या निवडीबद्दल  धाराशिव जिल्ह्यातील सर्व तांड्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.

या निवडीबद्दल जळकोट,आलियाबाद तांडा, सोमनिंग तांडा, रामतीर्थ तांडा, बोरमन तांडा  येथे सर्वञ आनंदाचे वातावरण आहे त्यांच्या योग्य निवडीबद्दल जळकोट चे  माजी सरपंच अशोक पाटील उपसरपंच प्रशांत नवगिरे, जि. प. सदस्य प्रकाश चव्हाण व  आलियाबादचे सरपंच सूर्यकांत चव्हाण, उपसरपंच  व ग्रामपंचायत सदस्य व आजी माजी सदस्यांकडून त्यांचे अभिनंदन केली.संतोष चव्हाण यांच्या निवडीबद्दल सर्वञ अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.


 
Top