तुळजापूर (प्रतिनिधी) - नागपंचमी पार्श्वभूमीवर श्रावण शुक्ल पक्ष 6 षष्ठी शके 1946 शनिवार दि. 10 ऑगस्ट रोजी तुळजाभवानी मातेस अलंकार महाअलंकार पुजा करण्यात आले. नागपंचमीच्या दुसऱ्या दिवशी सकाळी देविजींस भाविकांचे अभिषेक पुजा झाल्यानंतर देविजीस संपूर्ण सुवर्ण अलंकार घालण्यात आले होते. श्रीतुळजाभवानी दर्शनार्थ सुवासनी महिला, भाविकांनी मोठी गर्दी केली होती.