धाराशिव (प्रतिनिधी)- तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या दोन विद्यर्थिनिची सरळ सेवा भरती मधून धाराशिव जिल्हा परिषद मध्ये नुकतीच निवड झाली होती. तसेच सिव्हिल विभागाचा विद्यार्थी सुमित दशरथ भोसले याची महाराष्ट्र शासन अंतर्गत जलसंपदा विभाग नागपूर मंडळामध्ये स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक म्हणून निवड झाली त्या पाठोपाठ मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागाची विद्यार्थ्यांनी आश्लेषा अशोक हजगुडे हिची नुकतीच पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झाली आहे.
धाराशिव जिल्ह्यातीलच काजळा येथील आश्लेषा अशोक हाजगुडे हिची मेकॅनिकल इंजिनिअरिंगची पदवी तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयातून घेतल्यानंतर कुठलेही कोचिंग क्लास न लावता पहिल्याच प्रयत्नामध्ये पोलीस उपनिरीक्षक पदी नियुक्ती झाली.ही नियुक्ती झाल्याबद्दल नुकताच तेरणा ट्रस्टतर्फे आश्लेषा हीचा तेरणा ट्रस्टचे विश्वस्त मा. आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी तेरणा ट्रस्टचे विश्वस्त सतीश दंडनाईक, मुलीचे वडील श्री अशोक हाजगुडे, श्री नंदकुमार रणदिवे, श्री.अमर बाकले, श्री प्रशांत रणदिवे,श्री बबलू रणदिवे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विक्रमसिंह माने यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी बोलताना आ. राणाजगजितसिंह पाटील पाटील म्हणाले की, महाविद्यालयाने अथक मेहनत घेऊन विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासक्रमाबरोबरच कला कौशल्य ही विकसित केलेले आहेत. त्यामुळे सातत्यपूर्ण महाविद्यालयाचे विद्यार्थी हे स्पर्धा परीक्षेतून चांगल्या पोस्ट वर शासकीय सेवेमध्ये रुजू होणार आहे .ही अभिमानाची गोष्ट आहे. आणि मला खात्री आहे की यापुढे ही महाविद्यालयाचे अधिकाधिक विद्यार्थी शासकीय सेवेमध्ये रुजू होतील. आश्लेषा हिने कुठलाही क्लास न लावता केवळ महाविद्यालयातील कौशल्यावर आधारित जो अभ्यासक्रम होता त्याच्याच आधारावर तिने स्पर्धा परीक्षेची तयारी केली असल्याचे तिने यावेळी बोलून दाखविले. मागील पाच वर्षांमध्ये महाविद्यालयाच्या सर्वच विभागातील विद्यार्थ्यांनी शासकीय सेवेमध्ये विविध पदावर स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून आपला हक्क बजावला असून अभियांत्रिकी महाविद्यालयाचे 50 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांची पाटबंधारे पी.डब्ल्यू.डी, वॉटर रिसोर्स, नगरपरिषद, जिल्हा परिषद यासारख्या शासकीय तसेच विभागांमध्ये नदीच्या काळात सुरू झालेले आहेत.
तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने आ. राणाजगजितसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या व परिसरातील इतर विद्यार्थ्यांसाठी मागील दहा वर्षापासून तेरणा स्पर्धा परीक्षा अध्ययन केंद्र कार्यरत आहे. त्यामुळे स्पर्धा परीक्षेचे मार्गदर्शन व अभ्यास करण्यासाठी प्रेरणा मिळत आहे. या केंद्राच्या माध्यमातून महाविद्यालयाचे विद्यार्थी डेप्युटी कलेक्टर, तहसीलदार, कार्यकारी अधिकारी यासारख्या मोठ्या हुद्द्यावर निवड झाली आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये सुद्धा भरपूर विद्यार्थी शासकीय नोकऱ्यांमध्ये दिसतील अशी आशा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विक्रमसिंह माने यांनी व्यक्त केली. तेरणा ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. पद्मसिंह पाटील, मल्हार पाटील, मेघ पाटील आणि व्यवस्थापकीय समन्वयक प्रा.गणेश भातलवंडे, सर्व विभाग प्रमुख व महाविद्यालयाच्या कर्मचाऱ्यांनी निवड झालेल्या विद्यार्थिनीचे अभिनंदन केले आहे.