ढोकी (प्रतिनिधी)- परिश्रमाला जिद्द, चिकाटी आणि आत्मविश्वासाची जोड दिल्यास निश्चितच अपेक्षित फळ मिळते. परिस्थितीचा बाहू न करता आहे त्या परिस्थितीशी दोन हात करून यश कसे पदरात पाडता येईल, हा विचार करणारेसुद्धा बरेच जण आहेत. आपण ठरविलेले ध्येय गाठायचेच हीच खूणगाठ बांधून परिश्रम घेणाऱ्या शेतकऱ्याच्या मुलाला अखेर यश आले आहे. पोलीस दलात भरती होत आई-वडिलांच्या कष्टाचे फलीत केले आहे. रोहित राजेश दंडनाईक (रा. किणी ता.जि.धाराशिव) असे पोलिस झालेल्या शेतकऱ्याच्या मुलाचे नाव आहे. त्याची राज्य राखीव पोलीस दलामध्ये (एसआरपीएफ) निवड झाली आहे. रोहितच्या निवडीबद्दल तुगांव येथील सचिन लोमटे व सुषमा लोमटे या दांपत्यकडून त्याचा सत्कार करण्यात आला.

रोहितचे आई-वडील हे शेतकरी आहेत. आपला रोहित पोलीस झाल्याची वार्ता आई-वडिलांच्या कानावर पडतात त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू वाहू लागले. लेकरांनं परिस्थिती नसतानाही पोलीस होऊन कष्टाचं चीज केल्याचे समाधान आई-वडिलांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे जाणवत होते. रोहितच्या निवडी बद्दल तुगांव येथील सचिन लोमटे व सुषमा लोमटे या दांपत्यकडून सत्कार करण्यात आला. त्याप्रसंगी सेवानिवृत्त मेजर लिंबराज शिंदे, मैनाताई शिंदे यांनी मुलांनी ध्येय निश्चित डोळ्यासमोर ठेवल्यानंतर यश हमखास मिळते असे मत व्यक्त केले.त्याप्रसंगी रोहित ची आई प्रिया दंडनाईक, शिक्षक प्रविण मडके, प्रदीप मडके,सहाय्यक अभियंता मयूर शिंदे,मोहिनी शिंदे,बापू शिंदे, उपस्थित होते.  या यशाबद्दल रोहितचे सर्वत्र अभिनंदन होत असून कौतुकाचा वर्षाव होत आहे. पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसमोर रोहित ने चांगला आदर्श निर्माण केला असून परिस्थितीत तुम्हाला हरवू शकत नाही हेच रोहितने दाखवून दिले आहे.

 
Top