भूम (प्रतिनिधी)-  भुम तालुक्यातील जोतिबाचीवाडी येथे मंगळवारी दि.10 ऑगस्ट रोजी नागपंचमीच्या निमित्ताने जोतिबा मंदिरा जवळील मैदानात आयोजित कबड्डी स्पर्धेस स्पर्धेकांचा आणि प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. 

स्पर्धेचे हे 82 वे वर्ष होते. या स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे 21 हजार रुपये पारितोषिक शिवनेरी क्रिडा मंडळ भुम कबड्डी संघाने पटकावले. द्वितीय पारितोषिक 15 हजार रुपये सुरेश दादा धस क्रीडा मंडळ कुसळंब (जि.बीड), तृतीय पारितोषिक 11 हजार रुपये सुरेश दादा धस क्रीडामंडळ आष्टी,चतुर्थ पारितोषिक 7 हजार रुपये भुमच्या शिवनेरी क्रिडा मंडळ ब संघ भूम या संघाने पटकावले. याप्रसंगी प्रतापसिंह पाटील, आप्पासाहेब हुंबे, यादी मान्यवर उपस्थित होते.

भुम कृषी सहाय्यक आण्णासाहेब खटाळ,जोतिबाचीवाडी सरपंच वैभव वरबडे,शालेय शिक्षण समिती अध्यक्ष दादासाहेब भगत, दत्तु जाधव,संदिपान कोकाटे, आप्पासाहेब भराटे,यांच्या हस्ते विजेत्या संघाला पारितोषिक वितरण करण्यात आले. एकूण 32 संघांनी सहभाग नोंदविला. स्पर्धा यशस्वी होण्यासाठी जोतिबाचीवाडी येथील आण्णासाहेब पवार, संभाजी जगदाळे, लक्ष्मण जाधव, जयराम जगदाळे, तानाजी जगदाळे, तानाजी वरबडे, लक्ष्मण पवार, हनुमंत भराटे, प्रभाकर वरबडे, हरिदास जगदाळे, धनंजय जगताप तसेच सर्व कबड्डीप्रेमी आयोजकांनी परिश्रम घेतले.

 
Top