तुळजापूर (प्रतिनिधी)- मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील हे श्रावण मासातील पहिल्या मंगळवारी (दि. 6) सायंकाळी 6 वा तिर्थक्षेञ तुळजापूर ला दर्शनार्थ येणार असुन,यांच्या स्वागतासाठी धाराशीव महामार्ग रस्त्यावर  भाजपने डिझीटल लावले आहेत. तिर्थक्षेत्र तुळजापूर येथे भाजप ने लावलले डीझीटल फलक शहरात चर्चचा विषय ठरला आहे.

मराठा संघर्ष योध्दा मनोज जरांगे पाटील यांचे  कुलदैवत श्रीतुळजाभवानी असुन यापुर्वी  आमरण उपोषण सुटताच  त्यांची पत्नी, मुली, बहीण यांनी तिर्थक्षेञ तुळजापूरला येवुन श्रीतुळजाभवानी मातेचे दर्शन घेवुन देविचा कुलधर्म कुलाचार केला. आता चक्क देविचा वारा दिवशी मंगळवारी तिर्थक्षेत्र तुळजापूरात मराठा संघर्ष योध्दा मनोज जरांगे पाटील दर्शनार्थ व मुक्कामास येत आहेत. धाराशिव रोडवर भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटील, माजी नगराध्यक्ष सचिन रोचकरी, युवा नेते विनोद गंगणे यांचे छायचिञ असलेले डीझीटल लावले आहेत.

 
Top