तुळजापूर (प्रतिनिधी)- मला घडविण्यात लहानांपासुन मोठ्यांपर्यत सर्व जाती धर्म पंथाचा सहभाग आहे. आठ साखर कारखाने मी केलेल्या जलसंधारणाचे कामामुळे चालत आहेत. मी पुढच्या पिढीचे भविष्य घडविण्यासाठी मी आजपर्यत काम केले पुढे ही करणार असे प्रतिपादन माजीमंत्री मधुकर चव्हाण यांनी तुळजापूर येथे आयोजित कार्यकर्ते बैठकीत केले.
यावेळी व्यासपीठावर काँग्रेसच्या डॉ. स्मिता शहापुरकर, अशोक मगर, माधवराव कुतवळ, भागवत धस, मुकुंद डोंगरे, अशोक पाटील, प्रकाश चव्हाण, अँड रामचंद्र ढवळे, सिद्रामप्पा मुळे, शहाबाज काझी, सयाजीराव देशमुख, विश्वास शिंदे, मोदानी, धनराज मुळे, बालाजी धुगे, दिलीप सोमवंशी, धनंजय पाटील, शरद नरवडे सह अनेक मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना मधुकर चव्हाण पुढे म्हणाले कि, मी तालुक्यात सुतगिरणी उभी केली. आठ साखर कारखाने मी केलेल्या जलसंधारणाचे कामामुळे चालत आहेत. मी जनतेला विचारल्या शिवाय कधी विकास कामे केले नाहीत. तिर्थक्षेत्र तुळजापूरच्या विकासासाठी कै. विलासरावांनी प्रचंड निधी दिला ते योगदान विसरु नये, यासाठी त्यांचा पुतळा उभा करा असे आवाहन यावेळी केले.
मी कुसळीचा, दगडधोड्यांचा तालुका हिरवागार केला. मी गावापासुन ते दिल्ली पर्यतची निवडणुक लढवली व जिंकली. पाच वेळा तुम्ही काम करण्याची संधी दिली. त्या विश्वासाला तडा जावू देणार नाही असे यावेळी स्पष्ट केले. यावेळी अभिजीत चव्हाण, रणवीर चव्हाण, रुषी मगर, रणजित इंगळे सह कार्यकर्त्यांनी या बैठकीसाठी परिश्रम घेतले.