धाराशिव (प्रतिनिधी)- शबरी घरकुल योजनेअंतर्गत सन 2023-24 या आर्थिक वर्षात आदिवासी समाजाकरिता मंजूर झालेल्या हक्काच्या घरकुलांचा लोकार्पण सोहळा सोमवार 26 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी 10 वाजता पापनास नगर धाराशिव येथे आयोजित करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओंम्बासे यांच्या हस्ते घरकुलाचे लोकार्पण होणार आहे.

या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून ठाणे आदिवासी विकास विभागाचे अप्पर आयुक्त दीपककुमार मीना, धाराशिव जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मैनाक घोष तर एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प सोलापूरचे प्रकल्प अधिकारी धनंजय झाकर्डे, धाराशिवच्या तहसिलदार डॉ.सौ.मृणाल जाधव, नगर परिषदेच्या मुख्याधिकारी वसुधा फड, आदिवासी पारधी महासंघाचे प्रदेश कार्याध्यक्ष सुनील काळे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

धाराशिव शहरातील शासकीय दुध डेअरीच्या पाठीमागील पापनास नगर येथे होणाऱ्या या कार्यक्रमास उपस्थित राहावे, असे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प सोलापूरचे सहायक प्रकल्प अधिकारी विशाल सरतापे यांनी कळविले आहे.

 
Top