कळंब (प्रतिनिधी) - कळंब तालुक्यातील पाडोळी (नायगाव) गावच्या सरपंचपदी नितीन रमाकांत टेकाळे यांची बिनविरोध निवड झाली आहे.
गेल्या महिन्यात या गावच्या सरपंच यांच्या विरोधात अविश्वास ठराव संमत झाला होता. त्यामुळे येथील सरपंच पदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम झाला. सरपंच पदासाठी ग्रामपंचायत सदस्य नितीन रमाकांत टेकाळे यांचाच एकमेव अर्ज दाखल झाला. त्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी यांनी ते विजयी झाल्याची घोषणा केली. नितीन टेकाळे हे जिल्हा परिषदेचे माजी सभापती सूर्यकांत टेकाळे, माजी क्रीडा उपसंचालक जनक टेकाळे यांचे पुतणे व तेरणा साखर कारखान्याचे माजी व्हा.चेअरमन रमाकांत टेकाळे यांचे पुत्र आहेत.