धाराशिव (प्रतिनिधी)- तालुक्यातील ऊत्तमी कायापूर लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त भव्य मिरवणूक व शोभायात्रा उत्साहात पार पडली.

प्रारंभी लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या पुतळ्याचे  जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष नेताजीपाटील यांच्या हस्ते प्रतीमेचे पुजन करण्यांत आले.

साहीत्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या 104व्या जंयती निमित्त ऊत्तमी कायापुर येथे ग्रामीण भागातील सर्वात मोठी व भव्य दीव्य शोभा यांत्रा काडण्यात आली. या वेळी  भागातील महिला पुरुष तसेच समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी बच्चे कंपनी विविध गाण्यावर ठेका धरला होता. यावेळी परिसर अण्णाभाऊ साठे यांच्या जयघोषात दणाणून गेला. या वेळी मंडाळाचे अध्यक्ष श्री विठ्ठल जाधव. अजय जाधव, राम शेंडगे, सुरज जाधव, सागर जाधव, संजय जाधव, बंन्टी धावारे, राम जाधव, किसन जाधव, राहुल जाधव, विशाल जाधव व सर्व समाज बाधव उपस्थित होते. तसेच मंडळाचे मार्गदर्शक 

खंडु भाऊ जाधव यांनी आलेल्या सर्वे माण्यावराचे आभार मानले.

 
Top