धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव जिल्हा विस्तार अधिकारी संघटनेच्या कार्यकारिणीची बैठक सामाजिक न्याय भवन सभागृहात संपन्न झाली. या बैठकीमध्ये नवीन कार्यकारणी निवडण्यात आली असून संघटनेची अध्यक्षपदी सुशील फुलारी यांची तर सचिवपदी दत्तप्रसाद जंगम यांची निवड करण्यात आली आहे. या बैठकीमध्ये पीठासीन अधिकारी म्हणून मंगरुळ बीटचे शिक्षण विस्तार अधिकारी मल्हारी माने यांनी काम पाहिले.
विस्तार अधिकारी संघटनेच्या कार्यकारिणीचे कार्याध्यक्ष म्हणून येडशी बीटचे प्रकाश पारवे, महिला प्रतिनिधी म्हणून गटशिक्षण कार्यालयातील दैवशाला हाके, कोषाध्यक्षपदी बावी बीटचे चंद्रकांत चिलवंते यांना संधी मिळाली आहे.
यावेळी जिल्हयातील विस्तार अधिकारी यांना प्रतिनिधी म्हणून जिल्हा कार्यकारिणीवर संधी मिळाली आहे. यामध्ये तुळजापूर तालुक्यातून क्राक्रंबा बीटचे मल्लिनाथ काळे, उमरगा तालुक्यातून गटशिक्षण कार्यालयातील काकासाहेब साळूंके, परंडा तालुक्यातून पिंपळवाडी बीटचे अशोक खुळे, कळंब तालुक्यातून येरमाळा बीटचे संतोष माळी, वाशी तालुक्यातून पारगाव बीटचे सुधाकर कोल्हे, लोहारा तालुक्यातून आष्टा कासार बीटचे देविदास मुळजे, भूम तालुक्यातून भुम बीटचे सोमनाथ टकले तर धाराशिव तालुक्यातून रुईभर बीटच्या जयमाला शिंदे यांना संधी मिळाली आहे. याप्रसंगी सूचक म्हणून शिक्षण विस्तार अधिकारी राहुल भट्टी, तात्यासाहेब माळी, अनुमोदक म्हणून मधुकर तोडकर, दैवशाला हाके यांनी काम पाहिले.