धाराशिव (प्रतिनिधी)- येथील रामकृष्ण परमहंस महाविद्यालयात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जयसिंगराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली 78 वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
याप्रसंगी शिक्षणमहर्षी डॉ.बापूजी साळुंखे आणि संस्थामाता सुशिलादेवी साळुंखे यांच्या पुतळ्याला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ . जयसिंगराव देशमुख यांच्या शुभहस्ते पुष्पहार अर्पण करून महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी राष्ट्रीय छात्र सेनेचे कॅडेट्स यांचेकडून राष्ट्रीय ध्वजाला व महाविद्यालयाचे प्राचार्य यांना मानवंदना देण्यात आली. स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून मराठी विभागाने भित्तिपत्रिकेचे उद्घाटन केले. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जयसिंगराव देशमुख यांनी प्रा. स्वप्निल बुचडे व विद्यार्थी यांचे अभिनंदन केले.